विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार आहेत. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबद्दल माध्यमांसमोर कोणतेही विधान न करू नका, अशी सक्त ताकीद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर एकनाथ शिंदे हा खरा माणूस असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच ते निशाणा साधत असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून दिसत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनाच जरांगे लक्ष्य करत आहेत. कनाथ शिंदे हे मराठ्यांना आरक्षण द्यायला तयार होते, पण फडणवीस यांनीच यात अडथळे आणले,” असा आरोप करत जरांगे यांनी फडणवीस विराेधी भूमिका स्पष्ट केली आहे.
मनोज जरांगे सातत्याने फडणवीसांवर टीका करत असताना, एकनाथ शिंदे मात्र मौन राखताना दिसत आहेत. मंत्रिमंडळ बैठकीनंतर शिवसेनेच्या मंत्र्यांच्या घेतलेल्या गुप्त बैठकीत त्यांनी आपल्या मंत्र्यांनाही माध्यमांसमोर प्रतिक्रिया देऊ नका, अशा सूचना दिल्या आहेत.
शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई मात्र जरांगे यांच्या बचावासाठी पुढे आले आहेत. त्यांनी म्हटले की, “मराठवाड्याची बोलण्याची शैली तशीच आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी वापरलेला चुकीचा शब्द मागे घेतला/ मराठा समन्वय समितीचा सदस्य आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये मध्यस्ती करण्याची जबाबदारी जर आपल्याला दिली तर ती पार पाडू .
Don’t make statements against Jarange, warns Eknath Shinde, Jarange says Shinde is a true man!
महत्वाच्या बातम्या
- किती माजलाय तो जरांग्या, भाषा मग्रुरीची : गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबाेल
- मंत्र्याला काढण्याची घटनेतच तरतूद तर घटना दुरुस्ती कशासाठी, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
- न्यायदेवता अन्याय करणार नाही, मुंबईत जाणारच : मनाेज जरांगेंचा निर्धार
- एकेरी भाषा, आयाबहिणींवर अपशब्द खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनाेज जरांगेंना इशारा