विशेष प्रतिनिधी
बीड : माझ्याशी जर कुणाचे राजकीय वैर असेल, तर ठेवा. पण माझ्या बीड जिल्ह्याची बदनामी करणे चुकीचे आहे. बाहेरून आलेले असोत की याच मातीतले असोत, कुणीही असो बीडच्या नावाला डाग लावू नका, असा इशारा माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे. Dhananjay Munde
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बीडमध्ये आयोजित निर्धार मेळाव्यात धनंजय मुंडेंनी दीर्घ काळानंतर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, 200 दिवस मी गप्प बसलो. डबल सेंच्युरी झाली. पण या काळात बीड जिल्ह्याची जी बदनामी झाली, ती जिव्हारी लागली,
मुंडे यांनी आपल्या शैलीत शेरोशायरी सादर करत विरोधकांवर निशाणा साधला. धनंजय मुंडे म्हटले की, तुम्हारी सोच के सांचे में ढल नहीं सकता, जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता, अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या? तुम्हारे लोह से ये लोहा पिघल नहीं सकता!”
मी तटकरे साहेबांना सांगितले होते की मला भाषण करायचे नाही. पण आज जनतेसमोर उभे राहून हे बोलणे आवश्यक वाटले. मैदानात बोलायचे की सभागृहात हा प्रश्न होता. शेवटी मैदानातच बोलणे योग्य वाटले, असेही त्यांनी सांगितले.
मुंडे म्हणाले, बीड जिल्ह्याने अनेकदा महाराष्ट्राला दिशा दिली आहे. यापुढेही आपण सगळ्यांनी एकत्र येऊन पक्ष मजबूत करायचा आहे. हीच आपल्या मातीची, स्वाभिमानाची जपणूक आहे.
Don’t tarnish Beed’s name, warns Dhananjay Munde
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
- Devendra Fadnavis मुंबईत पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीमुळे आयटी, स्टार्टअप कंपन्यांचे रिव्हर्स मायग्रेशन, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Ashish Shelar महाराष्ट्राचा गौरव गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार