विशेष प्रतिनिधी
सांगोला : Shahajibapu Patil पैशावर तालुका विकत घेण्याचा नाद करू नका. ही लढणारी औलाद आहे.महाराष्ट्र मला घाबरतो, अन् आता ही कुत्री मांजरं मला घाबरवायला लागले आहेतShahajibapu Patil
शहाजी बापू पाटील यांनी सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीवरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. दीपक साळुंखे आणि भाजप नेते व पालक मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका करताना शहाजी बापू म्हणाले की- स्वाभिमानाची निवडणूक आहे. आपल्याला गुलाम बनविले, त्यापेक्षा जास्त मोठी गुलामगिरी आली आहे. गणपतराव देशमुख 75 वर्षे आणि मी 51 वर्षे इथे आहे, स्वाभिमानी जनता होती. आता हेलिकॉप्टर घेऊन येत धाड धाड गुंडशाही सुरू केली. निवडणुकीपूर्वी मला माहीत होते भाजपने कंबरडे मोडले. मला पाडण्यासाठी भाजपने शेकापला मदत केली. भाजपसोबत इतका प्रामाणिक वागून माझ्यासोबत का असे वागले?Shahajibapu Patil
या तालुक्यात दोनच राजे आहेत. एक म्हणजे गणपतराव देशमुख आणि दुसरा तो म्हणजे शहाजी बापू. आता गणपतराव देशमुख यांच्या समाधीला पूजनाचा अधिकारी यांचा नाही.
शहाजी बापू पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोणताही शब्द मी मोडला नाही. लोकसभेला मी आजारी असतानाही भाजप उमेदवाराला पंधरा हजाराचं मताधिक्य दिलं. मी माझ्या आजारपणाचा कोणताही विचार न करता काम करत राहिलो, याचं फळ मला दिलयं का?
“Don’t Try to Buy an Entire Taluka With Money,” Shahajibapu Patil Warns BJP Leaders, Calling Them ‘Dogs and Cats’
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : प्रो बैलगाडा लीग सुरू करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घाेषणा
- Sharad Pawar : काॅंग्रेसला ठाकऱ्यांचा नकाे हात, शरद पवारांची घेणार साथ
- संविधानिक संस्थांवर काँग्रेसच्या हल्ल्यांचा निषेध, २७२ माजी अधिकारी व न्यायमूर्तींचे खुले पत्र
- सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयावर महापालिका – जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य, नाेटिफिकेशन काढण्यासाठी थांबण्याचे न्यायालयाचे निर्देश



















