विशेष प्रतिनिधी
नागपूर : Chhagan Bhujbal आम्ही आमचे आरक्षण वाचवण्यासाठी झगडत आहोत आणि मराठ्यांना इथे ईडब्ल्यूएसमध्ये आरक्षण असतानाही त्यांना ओबीसीमध्ये वेगळे पाहिजे. यावरही शरद पवारांनी बोलले पाहिजे. त्या वेळी एक भूमिका आणि या वेळी वेगळी भूमिका असे चालायचे नाही, असा निशाणा ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर साधला आहेChhagan Bhujbal
आरक्षण प्रश्नावर सामंजस्य हवे असे सांगणारे शरद पवार दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला का आले नाही, असा सवाल करत भुजबळ म्हणाले, सर्वपक्षीय बैठकीची सूचना शरद पवारांनीच केली होती. उद्धव ठाकरे सरकारमध्येही मराठा समिती होती. मार्गदर्शक शरद पवारच होते. त्या समितीत अजित पवार, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण होते. त्या वेळी मराठा समाजासाठी समिती नेमण्याची गरज होती काय, असे पवार बोलले नाही.
भुजबळ म्हणाले, जरांगेंच्या सप्टेंबर २०२३ मध्ये आंतरवाली सराटीतील आंदोलनामध्ये महिलांचा सहभाग होता. जरांगेंशी बोलायला पोलिस गेले तर सकाळी बोलू, असे सांगितले. रात्री झालेल्या बैठकीस शरद पवारांचा एक अामदार उपस्थित होता. सकाळी पोलिस आल्यावर तुफान दगडफेक झाली. महिला पोलिसांना मारहाण झाली. ८४ जण जखमी झाले. शरद पवारांनी असे का झाले असे विचारायला हवे होते. पवार व उद्धव ठाकरे तेथे गेले म्हणून हा बाबा (जरांगे) मोठा झाला.Chhagan Bhujbal
ओबीसी आणि मराठा समाजासाठी वेगवेगळ्या दोन उपसमित्या स्थापन करण्याची गरज होती का, असा प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला आहे. “राज्य सरकारने दोन समाजांसाठी दोन उपसमिती नेमल्या आहेत. या दोन वेगवेगळ्या जातींच्या समित्या आहेत. एका जातीची समिती असेल तर तिथे दुसऱ्या जातीच्या समितीचा विचार होणार का? सरकारने सामंजस्य निर्माण करून दोघात एकता करायला पाहिजे होती. रास्त मागण्यांची पूर्तता कशा पद्धतीने करता येईल, यासाठी सर्वांनी पाऊल टाकले पाहिजे, असे मत शरद पवारांनी व्यक्त केले होते. त्यावर बोलताना छगन भुजबळ यांनी दुहेरी भूमिका चालणार नाही असे स्पष्ट केले.
Dual role will not work, Chhagan Bhujbal targets Sharad Pawar
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!