एकतर विजयी यात्रा, नाहीतर अंत्ययात्रा; मनोज जरांगे यांचा निर्वाणीचा इशारा

एकतर विजयी यात्रा, नाहीतर अंत्ययात्रा; मनोज जरांगे यांचा निर्वाणीचा इशारा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : एकतर इथून विजयी होऊन जाणार नाहीतर माझी अंत्ययात्रा जाणार. शांततेत मोर्चे काढून अपमानच पडला. समाजाचा किती अंत पाहणार? शेवटी गरिबांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, असा निर्वाणीचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे. Manoj Jarange

आम्हाला ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. आम्ही ओबीसीमध्ये जाणार म्हणजे जाणार, असे म्हणत मनोज जरांगे यांनी निर्धार बोलून दाखवला. तसेच मुख्यमंत्र्यांनी मला जेलमध्ये जरी टाकले तरी तिथे माझे उपोषण सुरू राहणार असल्याचा इशारा दिला.



जरांगे म्हणाले, सुप्रीम कोर्टाचा सरसकटला विरोध असण्याचे कारण नाही. पण कोर्टात अडचण असेल तर मराठा कुणबी ही उपजात आहे असे करा, सरसकट म्हणू नका. २०१२ च्या कायद्यानुसार मराठा आणि कुणबी पोटजात म्हणून घ्या सरसकट म्हणायची गरज नाही. सरकारला आता एकही कागदपत्र देणार नाही. कारण सरकारने १३ महिन्यांपूर्वी हैदराबाद गॅझेटकडून कागदपत्रे घेतले आहे. सातारा गॅझेट आहे तसेच मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे हे सिद्ध झाले आहे. राज्य मागासवर्ग आयोगाकडून ते घेणे गरजेचे आहे.

शिंदे समितीचे सगळ्यात महत्त्वाचे काम आहे नोंदी शोधणे, त्याचा अहवाल तयार करणे. त्याचे तीन खंड बनवले, सरकारला द्यावे. सरकारने हा अहवाल स्वीकारून कॅबिनेटसमोर ठेऊन ते पुढे स्वीकारावे. शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला तर कोणीही अडवू शकणार नाही. पण सरकारकडून वेळकाढूपणा सुरू आहे. १३ महीने काय भजे तळले का? आता तुम्ही मजा बघा, पोरं कसे नीट करतात यांना. आमचे आता पुरेच येणार आहेत. एकदा जर आमचे धोतरं आले न ते कोणालाच गिनत नाही. आमचा मेन माल आला की बघा मग काय होते ते, असे म्हणत जरांगे यांनी इशारा दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे महाराष्ट्र बिघडत जात असेल तर केंद्राने देखील विचार करणे गरजेचे आहे. तुम्हाला फक्त मुंबईचे बेट शिल्लक राहील, आजूबाजूला मराठे असणार आहेत आणि मी मेलोच तर महाराष्ट्र तर नाहीच पण मुंबई सुद्धा तुमचे राहणार नाही. फडणवीस म्हणाले होते की अपवादात्मक परिस्थितीत आरक्षण देता येत नाही, पण तेव्हा ते सत्तेत नव्हते. आता आजची परिस्थिती आरक्षण देण्याची आहे.

Either a victory march or a funeral procession; Manoj Jarange warning of nirvana

महत्वाच्या बातम्या

 

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023