विशेष प्रतिनिधी
पुणे : महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही, विरोधकांच्या हातात कोणतेही कोलित द्यायचे नाही, शेवटी महायुती आहे. मात्र, धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता आहे. त्यांना जी माहिती मिळाली त्यावर ते बोलले. त्यांनी सांगितले आहे माझी भाजप विरोधात भूमिका नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आळंदीत पत्रकारांशी बोलताना सांगितले. Eknath Shinde
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून जैन मंदिराच्या आणि हॉस्टेलच्या जागेवरून माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना हा पक्ष महायुतीचा घटक असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकरांवर कारवाई करावी अशी मागणी पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी केली होती.
दरम्यान, उपमुख्यमंत्री शिंदे हे एका कार्यक्रमासाठी आळंदी येथे आले असता याबाबत पत्रकारांनी त्यांनी प्रश्न विचारले. त्यावर, महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही. आता तो विषय संपला आहे. त्यांना जी माहिती मिळाली त्यावर ते बोलले. शेवटी महायुती आहे. विरोधकांच्या हातात कोणतेही कोलित द्यायचे नाही. धंगेकर अन्यायाविरोधात लढणार कार्यकर्ता आहे. या प्रकरणावर पडदा पडेल आणि विषय संपेल.
महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत. भाजप विरोधात माझी भूमिका नाही, असे धंगेकर यांनी सांगितले आहे.
पत्रकारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना, तुमचा धंगेकरांना पाठिंबा आहे का, असा प्रश्न विचारला. त्यावर शिंदे यांनी उत्तर देणे टाळले. तरीही पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, आता तुम्हाला माझ्या तोंडातून काही काढायचे आहे का, असे बोलून शिंदे निघून गेले.
आळंदीमध्ये आल्यानंतर मनाला समाधान वाटते. आपल्या घरी आल्यासारखे वाटते. इंद्रायणी नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. त्यावर काम सुरू आहे. आम्ही हा विषय गांभीर्याने घेतला आहे. इंद्रायणी प्रदूषणमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसमोर प्रेझेंटेशन झाले आहे. नदी स्वच्छ करणे हे आमचे पहिले काम आहे. नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी हे काही करावे लागेल ते आम्ही करू, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
Eknath Shinde Says: “Dhangekar is an Activist Who Fights Injustice
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांनी “शक्तिपीठ”चा अट्टाहास सोडावा, सतेज पाटील यांची मागणी, कृती समितीचा आंदोलनाचा इशारा
- आपल्याला हवा त्या पद्धतीने विषय संपविण्यासाठी भूमिका घेणार, जैन बोर्डिंग विक्रीवरून सुरू झालेल्या वादात मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन
- Harshvardhan Sapkal : राज्यातील मित्रपक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव, एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी पक्ष वाचवण्यासाठी: हर्षवर्धन सपकाळ
- Ajit Pawar : योग्यवेळी कर्जमाफी दिली जाईल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन



















