विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला मारला आहे. स्वतःला दुटप्पी शिवसेनेचे नेते मानणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी दाढी कापावी आणि राजीनामा द्यावा. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहकड जाऊन महाराष्ट्रात काय चालले आहे. हे विचारावे, असे ते म्हणाले.
मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंवर यांच्यावर दुबे यांनी खालच्या पातळीवर टीका केली. गरीब हिंदी भाषिकांना काय मारता? उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडूत या तुम्हाला उचलून आपटू, असे आव्हान दुबे यांनी ठाकरे बंधूंना दिले. संजय राऊत यांनी निशिकांत दुबे यांनी केलेल्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
ते म्हणाले, हा दुबे कोण आहे? मी येथील हिंदी भाषिक नेत्यांना दुबे यांनी दिलेल्या विधानाचा निषेध करण्याचे आवाहन करतो. तरच मी त्यांना म्हणने की, तुम्ही महाराष्ट्राचे आहात. भाजप खासदार मराठी माणसांविरुद्ध अशी वक्तव्य करत असताना मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ गप्प बसतात, याचे मला आश्चर्य वाटते.
ते कोणत्या प्रकारचे मुख्यमंत्री आहेत? त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची नावे घेण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्रात कधीच हिंदी भाषिक लोकांवर हल्ले झाले नाहीत. दुबेंना सरळ करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची आहे.
Eknath Shinde should cut his beard and resign, Sanjay Raut’s attack on Dubey’s statement
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी