विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ramdas Athawale महायुतीमध्ये एकनाथ शिंदे नाराज असणे स्वाभाविक आहे. आपल्याला मुख्यमंत्री होण्याची पुन्हा संधी मिळणार की नाही, अशी त्यांना शंका आहे. शिंदे उपमुख्यमंत्री होतील, असे मला वाटत नाही. परंतु, त्यांनी महायुतीचे अध्यक्ष पदाची जबाबदारी द्यावी, असा प्रस्ताव महायुतीतील घटक पक्ष रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजप वरिष्ठांसमोर मांडला आहे.Ramdas Athawale
मुख्यमंत्री पदाबाबत भाजपचे वरिष्ठ जो निर्णय घेतील, तो शिवसेनेला मान्य असल्याचे एकनाथ शिंदे यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. परंतु, एकनाथ शिंदे नवीन सरकारमध्ये कोणत्या भूमिकेत दिसतील, हे अद्यापही एक कोडेच आहे. अशातच रामदास आठवले यांनी दिलेल्या प्रस्तावावर भाजपचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात. त्यांनी निर्णय घेतला, तर एकनाथ शिंदे तो स्वीकारतील का हे पहावे लागणार आहे.
काय म्हणाले रामदास आठवले?
रामदास आठवले म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी नाराज होणे स्वाभाविक आहे. ते मागील अडीच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते आणि आता पुन्हा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळणार की नाही, याबाबत त्यांना शंका आहे. मात्र असे असले तरी विकासाच्या मुद्द्यावर महायुतीचे सरकार बनायला हवे, अशी त्यांची भूमिका आहे. एकनाथ शिंदे हे स्वत: उपमुख्यमंत्री होतील, असे मला वाटत नाही. मात्र त्यांना महायुतीचे अध्यक्ष म्हणून काम पाहावे. या माध्यमातून ते सरकारवर नियंत्रण ठेवू शकतात. त्यामुळे त्यांना हे पद देण्यात यावे, असे मला वाटत असल्याचे रामदास आठवले म्हणाले.
एकनाथ शिंदेंनी आजच्या बैठका केल्या रद्द
दरम्यान, दरे गावाहून परतल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या आमदारांची बैठक बोलावली होती. मात्र, ही बैठक रद्द करण्यात आली असून दिवसभरातील सर्व बैठकी रद्द करण्यात आल्या आहेत. डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्याने शिंदेंनी बैठक रद्द केल्याची माहिती आहे. त्यामुळे ते ठाण्यातील शुभदीप या बंगल्यावर आराम करीत आहेत. ताप आणि थ्रोट इन्फेक्शन झाल्याने त्यांना डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला आहे.
Eknath Shinde should serve as the president of the Mahayuti; Ramdas Athawale’s opinion
महत्वाच्या बातम्या
- Prithviraj Chavan पृथ्वीराज चव्हाण म्हणाले- फेरपडताळणीचा फायदा होणार नाही, EVM मशीनमध्ये प्रोगाम फीट आहे का हे तपासावे लागणार
- BJP : सावंत, राठोड, सत्तार आणि केसरकर यांच्या मंत्रिमंडळ समावेशावरून महायुतीत खरखर
- Ashok Chavan : अशोक चव्हाणांचा काँग्रेसवर हल्लाबोल, म्हणाले – माझ्या नेतृत्वात 82 जागा आल्या होत्या, बाबांनी 82 च्या 42, पटोलेंनी 42 च्या 16 केल्या
- Imtiaz Jalil : ईव्हीएमवर निवडणुका घेऊ नका, ताकद कळेल, इम्तियाज जलील यांचा सरकारला इशारा