विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर: पोलिसांवर गोळीबार करत त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या दरोडेखोराला पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत ठार केले. या दरोडेखोराचे नाव अमोल खोतकर असे आहे. त्याने आपल्या साथीदारांसह बजाजनगर परिसरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा घातला होता. Encounter of Robber
वडगाव कोल्हाटी परिसरात पोलिस आणि दरोडेखोरांमध्ये जोरदार चकमक झाली. खोतकर या परिसरात लपला असल्याची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा तिथे दाखल झाला. यावेळी खोतकरने पोलिसांवर गोळीबार केला, त्यात तो ठार झाला.बजाजनगरातील संतोष लड्डा यांच्या घरावर 7 मे रोजी ते अमेरिकेला गेले असताना दरोडा घालण्यात आला होता. त्यांचा विश्वासू केअरटेकर संजय झळके बंगल्यात होता. 15 मे रोजी रात्री 2 ते 4 च्या दरम्यान सहा दरोडेखोरांनी पिस्तुलाच्या धाकावर 5.5 किलो सोने आणि 32 किलो चांदी असा सुमारे 6 कोटींचा ऐवज लुटला.
गुन्हे शाखेची सात आणि एमआयडीसी वाळूज ठाण्याची दोन पथके गेल्या 11 दिवसांपासून तपास करत होती. खोतकर हा वडगाव कोल्हाटीतील कचरापट्टी भागात लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याला पकडण्यासाठी मध्यरात्री गुप्त कारवाई करण्यात आली. यापूर्वी पोलिसांनी पाच दरोडेखोरांना अटक केली होती, तर खोतकर हा या दरोड्याचा सूत्रधार असल्याचे समोर आले होते.काल मध्यरात्री पोलिसांनी खोतकर असलेल्या परिसराला घेरले. त्याची चाहूल लागताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांवर गोळीबार करत गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी प्रत्युत्तर देत त्याचा एन्काऊंटर केला. Encounter of Robber
Encounter of robber who opened fire on police and rammed car into them
महत्वाच्या बातम्या
- Economy : अर्थव्यवस्थेत भारताने जपानला टाकलं मागे, आता जर्मनीची वेळ
- Jyoti Malhotras : ज्योती मल्होत्राच्या फोनवरून मोठा खुलासा, पाकिस्तानी युट्यूबरसोबत करत होती काम!
- Lalu Prasad Yadav : बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव यांनी मोठी कारवाई
- Mysore Pak : आता ‘म्हैसूरपाक’ नाही ‘म्हैसूर श्री’ म्हणायचं