विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्रात सध्या भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापले आहे. मीरा रोडमध्ये अमराठी व्यावसायिकाला मारहाण आणि त्यानंतर ठाकरे बंधूंच्या संयुक्त मेळाव्यात केले गेलेले वादग्रस्त विधान हे आता देशपातळीवर चर्चेचा विषय ठरत आहेत. यावरून भाजपचे खासदार डॉ. निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिकेवर थेट हल्ला चढवत वादळ उठवले आहे.
एक्स (माजी ट्विटर) वर पोस्ट करत दुबे (Nishikant Dubey) यांनी लिहिले की,”हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर खरोखरच हिंमत असेल तर उर्दू भाषिकांवर हात उचलून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, हे तुम्हीच ठरवा!”
ही पोस्ट करताना त्यांनी थेट राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना टॅग करत त्यांच्यावर रोख ठेवला आहे. दुबे यांच्या या टीकेमुळे ठाकरे बंधूंवर धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाचा आरोप होत आहे.
मराठी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनी केंद्र सरकार आणि हिंदी भाषिकांवर टीका करत आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर मीरा रोड येथे मनसे कार्यकर्त्यांनी एका गुजराती व्यापाऱ्याला ‘मराठी बोला’ म्हणून मारहाण केली.
यानंतर वरळीतील मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात “कानाखाली वाजवा” असा सल्ला कार्यकर्त्यांना देत, अप्रत्यक्षपणे अशा प्रकारच्या कृतीचं समर्थन केलं.
ही घटना उघडकीस आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुस्पष्ट भाषेत अशा प्रकारच्या गुंडगिरीवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले “आम्हालाही मराठीचा अभिमान आहे, पण केवळ एखाद्याला मराठी येत नाही म्हणून त्याला मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. उद्या आपल्या लोकांना दुसऱ्या राज्यात अशा प्रकारची वागणूक मिळाली, तर आपण ते सहन करू का?”
फडणवीस म्हणाले, “कोणीही भाषेच्या नावाखाली गुन्हेगारी कृती करत असेल, तर अशा व्यक्तींवर कठोर कारवाई होईल. पोलिसांनी संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, कायद्याप्रमाणे पुढील पावले उचलली जातील. भारतात कोणत्याही भाषिक समुदायावर अन्याय सहन केला जाणार नाही.”
राजकीय विश्लेषकांच्या मते, सध्या मनसे आणि ठाकरे गट स्थानिक मराठी मतदारसंघ मजबूत करण्यासाठी भाषिक अस्मितेच्या मुद्द्यावर आक्रमक होत आहेत. मात्र, यामुळे महाराष्ट्रात धार्मिक आणि भाषिक सलोखा धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Even a dog is a tiger in our house, Nishikant Dubey’s direct challenge to the Thackeray brothers; Nationwide anger over linguistic politics
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी