विशेष प्रतिनिधी
वसमत: Bachchu Kadu शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील आंदोलनात आता प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनीही उडी घेतली आहे. छातीवर गोळ्या झेलू पण महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.Bachchu Kadu
शेतकरी शेतमजूर हक्क परिषदेच्या निमित्ताने वाई गोरक्षनाथ (ता. वसमत) येथे राज्यमंत्री बच्चू कडू आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलतांना कडू म्हणाले की, शक्तिपीठ महामार्गांची मागणीच कोणी केली नाही त्यानंतरही सरकार महामार्ग बांधण्याच्या तयारीत आहे. मात्र वेळप्रसंगी छातीवर गोळ्या झेलू पण हा महामार्ग होऊ देणार नाही.Bachchu Kadu
राज्यात पेरणी पासून ते काढणी पर्यंतची सर्व कामे हमी योजनेमध्ये झाली पाहिजेत. तसेच कर्जमुक्ती, दिव्यांगांच्या प्रश्नांवर आमची लढाई सुरु आहे. या मागणीसाठी शेतकरी, शेतमजूर हक्क परिषद घेतली जात आहे. पुढे परभणी, नांदेड, सोलापूर येथे कार्यक्रम होणार असून जळगाव येथे मोर्चा काढला जाणार आहे. या आंदोलनानंतरही शासनाने या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही तर ता. 28 रोजी बुटी बोरी (नागपूर) येथे सर्व एकत्र येऊन नागपूरला वेढा देणार आहे. त्यापुर्वी शासनाने आमच्या मागण्यांवर निर्णय घेणे अपेक्षीत असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील पवनार ते पत्रा देवी या सुमारे 802 किलोमीटरच्या शक्तिपीठ महामार्गांची कोणीही मागणी केली नाही. शेतकऱ्यांचीही मागणी नसतांना हा महामार्ग मंजूर करून शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. मात्र या महामार्गाला आमचा विरोध आहे. सरकारने या महामार्गाचे काम सुरु करू नये अन सुरु केलेच तर काम बंद करून वेळप्रसंगी गोळ्या झेलण्याची आमची तयारी असल्याचा इशारा कडू यांनी यावेळी दिला.
राज्यातील शेतकऱ्यांना काहीही कमी पडणार नाही असे सरकार सांगत आहे. मात्र नुकसानीचे पंचनामेच केले जात नाही त्यामुळे मदत कशी मिळणार. सरकारचे हे डुप्लिकेट बोलणे असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने पावसामुळे नुकसानी साठी मदत जाहिर करावी, कर्जमुक्ती जाहिर करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. सरकार एकीकडे हमी भाव जाहिर करीत आहे अन दुसरीकडे 3400 रुपयांनी सोयाबीन विक्री करावे लागत असेल तर हमी भावाचा अर्थ काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Even if I take bullets in my chest, I will not allow the highway to be built, Bachchu Kadu also joined the protest against the Shakti Peeth highway.
महत्वाच्या बातम्या
- Yogesh Kadam : ठाकरे बंधुंचे मराठी मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरणार ; योगेश कदम
- round of 11th admission : अकरावी प्रवेशाची विशेष फेरी, चार महिन्यांनंतरही संपेना प्रवेश प्रक्रिया
- ward structure in Pune : पुण्यातील प्रभाग रचनेवर विरोधक व नागरिकांचा रोष !
- Manoj Jarange : ओबीसी समाजाला मिळाले दुष्ट विचारांचा नेता, मनोज जरांगे यांचा हल्लाबोल