विशेष प्रतिनिधी
पुणे : दारूचा टँगो नावाचा ब्रँड कोणाचा आहे हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे अजित पवार यांच्याकडे उत्पादन शुल्क विभाग असेल तर हितसंबंधांचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे त्यांच्याकडील उत्पादन शुल्क विभाग काढून घेण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
गेल्या 50 वर्षातील नवीन दारू दुकानांना परवानगी द्यायची नाही हे धोरण सोडून नव्याने दारू दुकानांना परवानगी देण्याचा घाट घातला जात आहे. अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांची मद्यनिर्मिती करणारी कंपनी असल्याने हा निर्णय घेतल्याचा आरोप केला जात आहे. राज्यात दारू दुकानांचे परवाने काही कंपन्यांना देण्याचा प्रश्नावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, हे दारु परवाने खुले करण्यामागे पुण्याचे पालकमंत्री आहेत. तेच उत्पादन शुल्क खात्याचे मंत्रीही आहेत. टँगो नावाचा ब्रँड कोणाचा आहे हे सर्वांना माहित आहे. यात हितसंबंधांचे रक्षण ( Conflict of interest) स्पष्ट दिसत आहे, त्यामुळे त्यांच्याकडून उत्पादन शुल्क खाते काढून घ्यावे.
मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
भाजपाकडे मोठे चमत्कार करणारे ५६ इंच छातीचे नेतृत्व असून सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा ते करत असतात पण तो दावा पोकळ आहे. स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांना संधी देण्याचे सोडून दुसऱ्या पक्षातील नेते व पदाधिकारी यांच्यावर दबाव आणून, धमक्या देऊन भाजपात घेत आहेत. भारतीय जनता पक्ष चेटकीण आहे, तीला दुसऱ्या पक्षातील लोक खाण्याचा रोग जडला आहे असा आरोप त्यांनी केला.
काँग्रेस पक्ष नेत्यांचा नाही तर विचाराचा पक्ष आहे, सर्वांना सोबत घेऊ जाणारा पक्ष आहे. कोणी पक्ष सोडून गेल्याने पक्षाची ताकद कमी होत नाही. पुणे जिल्ह्यात काँग्रसे पक्षाची कामगिरी समाधानकारक झाली नसली तरी आगामी काळात नक्कीच यात बदल होईल. जे लोक ठरवून पक्ष सोडून जातात त्यांना थांबवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते थांबणार नाहीत. काँग्रेस पक्षाने ज्यांना आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री पद दिले त्यांनीही पक्ष सोडला. पक्ष सोडणारे आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगत आहेत पण असा अन्याय आपल्यावरही व्हावा अशी भावना पदाधिकारी बोलून दाखवत आहेत. जे पक्ष सोडून गेले त्यांना जनता व पक्षाचे कार्यकर्तेच जाब विचारतील असेही सपकाळ म्हणाले.
Everyone knows who owns the Tango brand, Congress demands that Ajit Pawar remove the excise department
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या अडचणी संपेनात! सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप
- jayant patil : राजीनाम्यावर मौन सोडताना जयंत पाटील यांचे भाजप प्रवेशावर भाष्य
- Kaustubh Dhavase : मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
- Shiv Sena dispute : शिवसेनेतील वादावर तीन महिन्यात निकाल, पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हाचा होणार फैसला