विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी बोलण्यावरून एका दुकानदाराला मारहाण केल्याने बिगर मराठी भाषकांमध्ये संपाचे वातावरण आहे. यातून सुशील केडिया या प्रसिद्ध व्यावसायिकाने थेट मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे याना आव्हान दिले आहे. मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा, असे त्यांनी म्हटले आहे. Sushil Kedia
पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादाने आता मराठी विरुद्ध अ मराठी असं रूप घेतलं आहे. केडियोनॉमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी एक्सवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये राज ठाकरे यांना टॅग करत म्हटले आहे.एक्सवरील आपल्या अकाउंटवरून राज ठाकरे यांना टॅग करत सुशील केडिया यांनी लिहिले की, गेली ३० वर्षे मुंबईत राहिल्यानंरही मला मराठी भाषा फारशी कळत नाही.
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
तसेच तुम्ही ज्या प्रकारे गैरवर्तन करत आहात ते पाहता जोपर्तंय तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसाची काळजी घेण्याचं नाटक करण्याची परवानगी दिली जात राहील, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही, काय करायचं बोला? काही दिवसांपूर्वी मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी मीरारोडमध्ये एका दुकानदाराने मराठीत बोलण्यास नकार दिल्याने त्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
सुशील केडिया हे एक प्रसिद्ध व्यावसायिक आणि केडियानोमिक्सचे संस्थापक आहेत. ते शेअर बाजारातील तज्ञ आणि गुंतवणूक सल्लागार म्हणून ओळखले जातात.
मनसैनिकांनी जोधपूर मिठाई दुकानदाराला केलेल्या मारहाणीविरोधात मीरा भाईंदर येथील व्यापाऱ्यांनी गुरूवारी मोर्चा काढला. या मोर्चात हजारो व्यापारी सहभागी झाले होते. मनसेने या प्रकरणी अधिक आक्रमक भूमिका घेत हा मोर्चा व्यापाऱ्यांचा नव्हे तर भाजपचा असल्याचा आरोप केला. यामुळे हा वाद अधिकच चिघळण्याची चिन्हे आहेत. स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांनीच व्यापाऱ्यांना भडकावून हा मोर्चा काढण्यास सांगितले. बुधवारी रात्री संबंधित व्यक्तीला मी स्वतः भेटून त्यांच्याशी बोललो. त्यावेळी त्यांनी मोर्चा वगैरे काढणार नाही, असे सांगितले व झालेल्या घटना चूक असल्याचेही सांगितले. पण गुरूवारी अचानक हजारो व्यापारी रस्त्यावर उतरल्याने हा मोर्चा भाजपाचा असल्याचे स्पष्ट झाले, असे मनसेचे नेते अविनाश जाधव म्हणाले.
Famous businessman Sushil Kedia directly challenges Raj Thackeray in Marathi :
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी