विशेष प्रतिनिधी
मुंबई : वारंवार कर्जमाफी मागायला शेतकरी काही भिकारी नाहीत, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुनावले आहे. Ajit Pawar
शेतकरी कर्जमाफी वारंवार कशी मिळणार? आम्ही निवडून येण्यासाठी शेतकऱ्यांना हे आश्वासन दिले होते, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार केले होते. त्यावर टीका करताना राजू शेट्टी म्हणाले, शेतकरी काही भीक मागत नाही. मला अजित पवारांचे विधान मान्य आहे. पण त्यासाठी आधी सरकार म्हणून अजित पवारांनी एक व्यवस्था निर्माण करावी. महाराष्ट्रातील एकाही शेतकऱ्यावर उत्पादन खर्चापेक्षा कमी किंमतीत शेतमाल विकण्याची वेळ येणार नाही अशी धोरणे सरकारने तयार करावीत. त्यांच्याकडे वारंवार कर्जमाफी मागायला आम्ही शेतकरी काही भिकारी नाही.
आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, शेतकरी वेळच्या वेळी कर्ज भरतो, पण सरकारच्या उदासीन धोरणांमुळे शेतकऱ्यांचा खर्च देखील निघत नसेल तर शेतकऱ्याने कर्ज फेडायचे तरी कसे? निवडणुका होत्या म्हणून आश्वासन दिले, शेतकऱ्यांनी आर्थिक शिस्त लावावी, वेळच्या वेळी कर्ज फेडावे यासंदर्भात आपण केलेलं वक्तव्य अत्यंत निंदाजनक असून शेतकऱ्यांची खिल्ली उडवणारं आहे. संगतीचा हा परिणाम असला तरी आपल्याकडून ही अपेक्षा नव्हती!
शेतकऱ्यांना दिलासा देता येत नसेल तर किमान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ तरी चोळू नका. आता मीठ चोळलं तर दिलगिरी व्यक्त कराल, ही अपेक्षा! महत्वाचं म्हणजे हे सगळं बघितलं तर काल सरकारने दिलेलं आश्वासन म्हणजे बुडणाऱ्या बँकेचा कधीही न वटणारा पोस्ट डेटेड चेक आहे , असंच म्हणावं लागेल, असेही रोहित पवार म्हणाले.
अजित पवार शुक्रवारी बारामतीत बोलताना म्हणाले होते की, शेतकरी कर्जमाफी वारंवार कशी मिळणार? शेतकऱ्यांनी कर्ज फुकटात मिळण्याची सवय लावून घेऊ नये. कर्जमाफीबाबत जूनला निर्णय घ्यायचं ठरलंय. तो निर्णय कसा होईल ते आम्ही एप्रिलमध्ये तुम्हाला सांगू. पण तुम्हीसुद्धा शून्य टक्के व्याजदराने पैसे दिल्यावर वेळच्या वेळी पैसे परत करण्याची सवय लावा ना. सारखंच फुकटात, सारखंच माफ.. कसं व्हायचं? असं चालत नाही. एकदा शरद पवारांनी कर्जमाफी दिली, एकदा देवेंद्र फडणवीसांनी दिली, एकदा उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये आम्ही दिली, आता पुन्हा आम्हाला निवडून यायचं होतं, म्हणून सांगितलं आम्ही माफ करू. लोक म्हणतात तुम्ही सांगितलं होतं माफ करू, आता करा माफ.
Farmers are not beggars who repeatedly ask for loan waiver, Raju Shetty tells Ajit Pawar
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा



















