Pasha Patel : शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय लावून घ्यावी, पाशा पटेल यांचा अजब सल्ला, सरकार मदतीस असमर्थ असल्याचा दावा

Pasha Patel : शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय लावून घ्यावी, पाशा पटेल यांचा अजब सल्ला, सरकार मदतीस असमर्थ असल्याचा दावा

Pasha Patel

विशेष प्रतिनिधी

धाराशिव :Pasha Patel  शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय लावून घ्यावी. सरकार नुकसान भरपाई देऊ शकत नाही, असा अजब सल्ला भाजप नेते आणि केंद्रीय कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.Pasha Patel

पाशा पटेल म्हणाले, ३६५ दिवसांपैकी तब्बल ३२२ दिवस शेतकऱ्यांना संकटाशी झगडावे लागणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आपण निसर्गाचे प्रचंड नुकसान केले आहे, त्याचे भोग आता भोगावे लागणार आहेत. संकटे एवढी मोठी आहेत की त्या संकटामध्ये झालेले नुकसान कधीही भरून येण्याची शक्यता नाही. तात्पुरतं उभं राहण्यापुरतं सरकार देऊ शकते. पूर्ण काही देऊ शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना निसर्गाच्या प्रकोपाची सवय लावून घेणे भाग आहे. कारण पावसाची अनिश्चितता, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट हे शेतकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय लावून घ्यावी. अतिवृष्टी व आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आता सरकार भरून देऊ शकत नाही.Pasha Patel



अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीला शेतकरी तोंड देत असताना, तो अडचणीत सापडलेला असताना राज्य कृषिमूल्य आयोगाचे उपाध्यक्ष पाशा पटेल यांनी अत्यंत चुकीचे विधान केले आहे. कर्माची फळं भोगा म्हणजे काय? शेतकऱ्यांनी या निसर्गाचं नेमकं काय नुकसान केले? हे पाशा पटेल यांनी सांगावे. या निसर्गासाठी भाजप सरकारने ३३ कोटी वृक्षलागवड केली. त्या ३३ कोटी झाडाचे काय झाले? ती ३३ कोटी झाडे कुठे आहेत. तुम्ही चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांबाबत वक्तव्य कराल तर शेतकरी शांत बसणार नाहीत, असा इशारा छावा संघटनेकडून देण्यात आला आहे.

शेतकऱ्यासंदर्भात पाशा पटेल यांचे वक्तव्य दुर्दैवी असल्याचे म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी टीका केली. ते म्हणाले, राज्यातील शेतकरी वाईट परिस्थितीतून जात असताना पाशा पटेल यांच्यासारखे नेते असे बेजबाबदार बक्तव्य कसे करू शकतात. प्रजा ज्यावेळी अडचणीत असते त्यावेळी राजाने त्यांना मदत करणे अपेक्षित असते. सरकारी पदावर असलेल्या माणसाने असे वक्तव्य करणे योग्य नाही.

Farmers should get used to losses, Pasha Patel’s strange advice, claims that the government is unable to help

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023