मर्सिडीज, फॉर्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटणार नाही, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्पष्ट

मर्सिडीज, फॉर्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटणार नाही, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्पष्ट

विशेष प्रतिनिधी

अमरावती : खऱ्या गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देणार आहोत.पण ज्यांचे लेआऊट आहेत, शेतीवर कर्ज काढून ज्यांनी मर्सिडीज, फॉर्म हाऊससाठी घेतलेल्यांना कर्जमाफी भेटणार नाही, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.

अमरावती जिल्ह्यातील कौडण्यापूर येथील विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी गेल्यानंतर आयोजित कार्यक्रमातून राज्य सरकारच्या योजनांबाबत माहिती देताना बावनकुळे म्हणाले, आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने लाडक्या बहि‍णींसाठी जो महिना 1500 रुपये सुरू केला होता, तो पुढच्या काळात लाडक्या बहिणीना 2100 रुपये देणार आहोत. आमच्या शेतकऱ्यांना आम्ही शेतकऱ्यांना शब्द दिला होता की, शेतकऱ्यांना पुढील 5 वर्षे शेतात वीजेचा बिल येणार नाही.



आमच्या सरकारने सांगितले की, खऱ्या खऱ्या गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार आहोत. त्यांची कर्जमाफी आम्ही करणार आहोत, पण शेतीवर कर्ज काढून ज्यांनी मर्सिडीज घेतल्या, ज्यांचे लेआऊट आहेत, फॉर्म हाऊससाठी कर्ज घेतलेल्यांना कर्जमाफी भेटणार नाही. धन दांडग्याना कर्जमाफी नको, ज्यांना गरज आहे त्यांनाच कर्जमाफी मिळायला हवी, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती तयार होत आहे. अधिवेशन काळात ती समिती घोषित करू. शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यासोबत कालच चर्चा झाली आहे. येत्या 3 तारखेला 4 वाजतापासून रात्री 10 वाजेपर्यंत बच्चू कडू यांच्यासोबत विधानभवनात बैठक लावली आहे. माझ्या दालनात बैठका लावल्या आहेत. या बैठकीत 8 ते 10 मंत्री सोबत असतील, तेव्हा महत्त्वाच्या निर्णयाचे शासन निर्णय होतील, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

यंदाच्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा कार्यक्रम आणि वेळापत्रक निश्चित झाले आहेत. त्यानुसार 30 जून ते 18 जुलै या काळात पावसाळी अधिवेशन होणार आहे. यंदाच्या पावसाळी अधिवेशनात शाळांमध्ये पहिलीपासूनची हिंदी भाषेची सक्ती, शक्तीपीठ महामार्ग आणि शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून महायुती सरकारला घेरले जाण्याची शक्यता आहे.

Farmers with Mercedes, farmhouses will not get loan waiver, Revenue Minister Chandrashekhar Bawankule clarified

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023