Krishna Andekar : १७ व्या वर्षी फायरिंग, खुनाचं कारस्थान, काय आहे कृष्णा आंदेकरचा इतिहास?

Krishna Andekar : १७ व्या वर्षी फायरिंग, खुनाचं कारस्थान, काय आहे कृष्णा आंदेकरचा इतिहास?

Krishna Andekar

विशेष प्रतिनिधी 

पुणे : Krishna Andekar एन्काउंटरच्या भीतीने काल (ता. १६) कृष्णा आंदेकर पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनमध्ये येऊन पोलिसांसमोर सरेंडर झाला. खरं तर ५ सप्टेंबरच्या रात्री आयुष कोमकरची हत्या झाल्यानंतर, या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला कृष्णा आंदेकर फरार होता.

मात्र त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला आणि मृत्यूच्या भीतीने त्या सापळ्यात अडकून कृष्णा आंदेकर शरण आला. कृष्णा आंदेकरच्या आत्मसमर्पणामुळे आयुष कोमकर हत्या प्रकरणातील एक महत्वाचा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला आणि या हत्येच्या तपासाला वेग आला. Krishna Andekar



कोण आहे कृष्णा आंदेकर?

कृष्णा आंदेकर हा नात्याने बंडू आंदेकरचा मुलगा आणि दिवंगत माजी नगरसेवक वनराज आंदेकरचा भाऊ आहे. आंदेकर कुटुंबातील सर्वात तापट व्यक्ती म्हणून कृष्णाला ओळखलं जातं. घरातच गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे त्याला लहानपणापासूनच गुन्हेगारीचं प्रचंड आकर्षण होतं. हेच आकर्षण त्याला अजिबात स्वस्थ बसून देत नव्हतं. त्यामुळे त्याला अगदी कमी वयातच स्वत:ला सिद्ध करण्याची खुमखुमी आली होती.

‘… अशी झाली कृष्णा आंदेकरच्या गुन्हेगारीला सुरुवात’

कृष्णा तारुण्यात असतांना, सुरज ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाड हे दोघेजण बंडू आंदेकरांचे राईट हँड म्हणून ओळखले जात होते. मात्र आपण असताना आपल्या वडिलांच्या टोळीत दुसराच कुणीतरी राईट हँड होतोय, ही गोष्ट कृष्णाच्या पचनी पडत नव्हती. त्यातूनच कृष्णा आंदेकरचे सुरज ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाड यांच्यासोबत खटके उडू लागले. कालांतराने कृष्णा आणि सुरज ठोंबरे यांच्यातला वाद इतका विकोपाला गेला की, चार वर्षांपूर्वी कोंढवा परिसरात कृष्णा आंदेकरने सुरज ठोंबरेवर फायरिंग देखील केली होती. Krishna Andekar

नशिबाने या हल्ल्यातून सुरज ठोंबरे बचावला होता. मात्र फायरिंग केल्यामुळे गुन्हा दाखल होऊन कृष्णा आंदेकर तुरुंगात गेला. यात धक्कादायक बाब, म्हणजे जेव्हा त्याने कोंढव्यात ही फायरिंग केली होती, तेव्हा त्याचं वय केवळ १७ वर्ष होतं. त्याचं वय कमी असल्याने तो शिक्षा संपवून तुरुंगातून लवकर सुटला.

याचकाळात बंडू आंदेकरने पुण्यात सोमनाथ गायकवाड पोलिसांच्या मदतीने पत्त्यांचा क्लब सुरु करून दिला. सोमनाथने क्लब चालवण्याच्या मोबदल्यात बंडू आंदेकरला विशिष्ट रक्कम द्यायची, असा दोघांमध्ये व्यवहार ठरला. त्याकाळात सोमनाथला क्लबमधून जास्त पैसे मिळू लागले. ही गोष्ट लक्षात आल्यावर बंडू आंदेकर आणि सोमनाथ गायकवाड यांच्यात मोठा वाद झाला. तेव्हा कृष्णाने पत्यांच्या क्लबमध्ये शिरुन जबरदस्तीने ताबा मिळवला होता. तेव्हा या वादानंतर कृष्णा आंदेकर आणि सोमनाथ गायकवाड यांच्यात टोकाचं वैर निर्माण झालं होतं. या रागातूनच २०२३ मध्ये कृष्णाने सोमनाथला मारण्यासाठी सापळा रचला होता.

तेव्हा त्याच्या कटात बंडू आंदेकर, स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर हे देखील सहभागी होते. तेव्हा या सगळ्यांनी मिळून सोमनाथचा मावसभाऊ असलेल्या निखिल आवाडेवर हल्ला करून २३ वार केले होते. तसंच त्या हल्ल्यानंतर तो जिवंत राहू नये. याची खबरदारी म्हणून डोक्यात दगड घातला होता. तेव्हा देखील या प्रकरणात कृष्णा आंदेकर जेलमध्ये गेला होता. पण काही तांत्रिक पुराव्यांमुळे त्याच्यावर मोक्का अंतर्गत झालेली कारवाई टिकू शकली नाही आणि कृष्णा जेलमधून बाहेर पडला. यानंतर तो  पूर्वीपेक्षा जास्तच आक्रमक झाला. त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कारवाया दिवसेंदिवस वाढतच गेल्या. Krishna Andekar

मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आंदेकर कुटुंबात वनराज आंदेकरची काही प्रमाणात शांत आणि सौम्य प्रतिमा होती. त्यामुळे त्याच प्रतिमेच्या आधारे राजश्री आंदेकर पाठोपाठ वनराज आंदेकरही नगरसेवक झाला. या काळात कोमकर आंदेकरांच्या टोळीचा सगळा हिशोब त्यांचे जावई असलेले कोमकर बंधू ठेवत होते. गुन्हेगारी विश्वात आपलं वलय वाढू लागल्यानंतर बंडू आंदेकरने आपल्या सगळ्या मुलांना आणि मुलींनाही गुन्हेगारी क्षेत्रात आणलं. यात बंडू आंदेकरच्या मुली संजीवनी आणि कल्याणी कोमकर या बहिणी जावा झाल्या.

मात्र या सगळ्यात वनराज आंदेकर नगरसेवक झाल्यामुळे या टोळीत त्याचा प्रभाव चांगलाच वाढला. त्यामुळे टोळीतून आलेले ठेकेदारीचे सगळे पैसे थेट त्याच्याकडे येऊ लागले. पुढे तर वनराज आंदेकरने टोळीच्या कामातही लक्ष घालायला सुरुवात केली. Krishna Andekar

त्यामुळेच वनराजचा वाढता प्रभाव बघून कोमकर अस्वस्थ झाले. परिणामी आंदेकर आणि कोमकर यांच्यात वाद निर्माण झाले. त्यातूनच २०२४ च्या सप्टेंबर महिन्यात वनराज आंदेकरची हत्या घडवून आणली. वनराजच्या चितेला अग्नी देताना वर्षभरात भावाच्या हत्येचा बदला घेणार, अशी शपथ घेऊन कृष्णा आंदेकरने शस्त्रपूजन केलं होतं.

शपथ घेतल्याप्रमाणे कृष्णाने वनराजच्या हत्येला १ वर्ष पूर्ण होताच हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकरच्या मुलाची, म्हणजेच आयुष कोमकरची ५ सप्टेंबरच्या रात्री नाना पेठेत गोळ्या घालून हत्या केली. आयुषच्या अंगावर एकूण ९ गोळ्या झाडत त्याच्या शरीराची अक्षरश: चाळण केली आणि आपल्या भावाच्या हत्येचा बदला घेऊन मुख्य आरोपी कृष्णा आंदेकर फरार झाला. Krishna Andekar

मात्र “कृष्णाची माहिती दे, नाहीतर त्याचा एन्काउंटर होईल,” हे वाक्य ऐकून मृत्यूच्या भीतीने कृष्णा आंदेकर पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनमध्ये येऊन पोलिसांसमोर सरेंडर झाला. आणि आयुष कोमकर खून प्रकरणात महत्त्वाचा दुवा असलेल्या कृष्णा आंदेकरने मारेकऱ्यांना पिस्तूल पुरविल्याचं पोलिस तपासात दिसून आलं आणि कृष्णा आंदेकर हाच आयुष कोमकरच्या खुनाचा मास्टरमाइंड असल्याचं निदर्शनास आलं.

तेव्हा आता कृष्णाला ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला नेमकी कशी दिशा मिळतीये यातील गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा मिळेल का? आणि त्याचबरोबर पुण्यातील गुन्हेगारीला आळा बसेल का? याची उत्तरं येत्या काही दिवसांतच मिळतील. Krishna Andekar

Firing at the age of 17, murder conspiracy, what is Krishna Andekar’s history?

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023