विशेष प्रतिनिधी
मुंबई : Pratap Sarnaik आम्ही आधी शिवसैनिक आणि नंतर मंत्री झालो आहोत, हे लक्षात ठेवा. प्रसिद्धीसाठी महाराष्ट्राची बस अडवली, पण तुमच्या बसही महाराष्ट्रात येत असतात, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कन्नड रक्षक वेदिकेला दिला आहे Pratap Sarnaik
कर्नाटकात कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या एसटी बसवर हल्ला केला. कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या बसला काळं फासले. चालकाला मारहाण करत कन्नड येते का? अशी विचारणाही केली. कर्नाटकातील चित्रदुर्गजवळ हा प्रकार घडला.
सरनाईक म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी सीमा प्रश्नावर 2 महिने कारावास भोगला आहे. शिवसेनेची स्थापना भल्यासाठी झाली आहे. महाराष्ट्रातील शिवसैनिक हातात बांगड्या घालून बसलेला नाही, असे म्हणत प्रताप सरनाईक यांनी थेट इशारा दिला.
एसटी बसवरील हल्ल्याप्रकरणी प्रताप सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला आणि चालकाला काळे फासण्याचा प्रकाराचा निषेध आहे. या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी मी बोलणार आहे.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पुढाकार घेत कन्नड रक्षक वेदिका संघटनेला विरोध केला आहे. पुण्यात कर्नाटक सरकारच्या बसवर काळं फासण्यात आलं आहे.
First Shiv Sainik then Minister, Pratap Sarnaik’s warning to Kannada Rakshak Vedike
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Nirupam : एसआरए प्रकल्पांमध्ये हिंदू कमी करून हाऊसिंग जिहाद, संजय निरुपम यांचा आरोप
- धक्कापुरुष कायमचा घरी बसविला , एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- Raj Thackeray मराठी भाषा गौरव दिनी मनसेचे पुस्तक प्रदर्शन, राज ठाकरेही आवडीची कविता सादर करणार
- Sharad Pawar शरद पवार यांनी सांगितलं आपल्या पंतप्रधानपदाचा किस्सा, नाव शॉर्टलिस्ट पण…