विशेष प्रतिनिधी
पुणे: महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे आयोजित तिसरी ते नववीच्या वर्गांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षेचे पेपर आणि उत्तरे खाजगी युट्यूब चॅनेल्सवर लिक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची कोणतीही परवानगी न घेता प्रश्नपत्रिका प्रसारित केल्या प्रकरणात आता खासगी यू-ट्युब वाहिनीवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. classes 3 to 9 leaked
याबाबत संगिता प्रभाकर शिंदे (वय ५०, रा. हडपसर) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३, ३ (५) सह महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षामध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार अनोळखी युट्युब चॅनेलचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगिता शिंदे या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे सहायक संचालक पदावर कार्यरत आहेत.
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे खाजगी अनुदानित तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील तिसरी ते नववीपर्यंतच्या वर्गांसाठी एका मुल्यमापन चाचणी परीक्षा आयोजित करण्यात येते. या चाचणी परीक्षेचा नियोजित पेपर आणि आणि त्याची उत्तरे काही युट्युब चॅनेलवर प्रसारित करण्यात आली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एससीईआरटीकडून विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. अज्ञात युट्युब चॅनेलधारकाने परिषदेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षेचे पेपर तसेच त्याची उत्तरे एससीईआरटीची पूर्वपरवानगी न घेता प्रसारित केली.
प्राथमिक तपासात, शासकीय आदेशाचे उल्लंघन करून, परवानगी नसताना अज्ञात व्यक्तीकडून प्रश्नपत्रिका मिळवून त्यातील प्रश्न आणि त्यांची उत्तरे कैलासन सर मॅथ्स, म मराठी, आणि एस. जे. ट्यूशन क्लासेस या तीन यू-ट्युब वाहिन्यांची प्रसारित केल्याचे समोर आले आहे.
एससीईआरटी या संस्थेकडून युट्युबवर नियोजित पेपर उत्तरांसह प्रसारित झाल्याची तक्रार प्राप्त झाली. त्यानंतर तात्काळ हे व्हिडीओ युट्युबवरून डिलीट करण्यात आले आहे. या युट्युब चालकांबाबत तपास सुरू असल्याचे विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अरुण घोडके यांनी दिली.
राज्य शासनाने २०२१ पासून तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मराठी, गणित आणि इंग्रजी या विषयांची नियतकालिक मूल्यांकन चाचणी सुरू केली आहे. सर्व शासकीय तसेच निमशासकीय व अनुदानित शाळांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी २०२३ पासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ६ ते ८ ऑगस्ट या कालावधीत पायाभूत चाचणी आयोजित केली होती. यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. \
१७ ते ३१ जुलै या काळात परीक्षा साहित्य कार्गो कंपनीद्वारे पाठवण्यात आले होते. मात्र, ६ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता एका यू-ट्युब वाहिनीवर, संबंधित जिल्ह्यांना पाठवलेल्या चाचणी पत्रिकांपैकी सातवीच्या मराठीची (५ ऑगस्ट रोजी झालेली) आणि ७ ऑगस्टला होणाऱ्या सातवी व आठवीच्या गणिताच्या प्रश्नपत्रिका प्रसारित झाल्याचे संगिता शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
Foundation test papers for classes 3 to 9 leaked, papers and answers released on YouTube channel
महत्वाच्या बातम्या
- Dnyaneshwari Munde : महादेव मुंडे यांना ओळखत नव्हता तर पोलिसांना का कॉल केले? ज्ञानेश्वरी मुंडे यांचा सवाल
- Uddhav Thackeray हिंदूंना बदनाम करण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचा सवाल
- सच्चे भारतीय असाल तर अशी वक्तव्यं करूच शकत नाही…चीनबाबत आरोपांवरून सुप्रीम कोर्टानेच उपटले राहुल गांधींचे कान
- कोथरूड प्रकरणात पोलिसांवर कारवाई नाही; ती ओबीसी पीडित कोण ? रोहित पवारांचा पुणे पोलिसांना सवाल!