विशेष प्रतिनिधी
पुणे : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मागणी बेकायदा आहे. शासनाने त्यांना वस्तुस्थिती समजून सांगितली पाहिजे, नाही तर महाराष्ट्रात अराजकता निर्माण होऊ शकते, असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी दिला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनोज जरांगे त्यांच्या समर्थांसह मुंबईच्या आझाद आझाद मैदानावर ते उपोषण करणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना हाके (Laxman Hake) म्हणाले, मराठा तेवढा मेळवावा ओबीसी मुळासकट संपवावा, असाच जरांगेंच्या मागणीला अर्थ होतो. ओबीसी जरांगेंच्या आंदोलनाला प्रति आंदोलन पुकारतील. त्यांची संख्या जेवढी आहे त्याच्या दहापट संख्या महाराष्ट्राच्या रस्त्यावर उतरलेली दिसेल.
जरांगे कधी कोणाची स्तुती करतील आणि कोणाच्या रसदीवर आंदोलन उभे करतील याचा नेम नाही, असा आराेप करून हाके (Laxman Hake) म्हणाले, अजित पवारांच्या आमदारांनी जरांगेंना रसद पुरवली, जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांच्या विरोधात खालच्या पातळीवर टीका करत आहेत, मात्र तरी देखील सत्तेतील माणसे जरांगे पाटलांना रसद पुरवत आहेत. ओबीसीच्या मंत्र्यांनी गट निर्माण करून मुख्यमंत्र्यांशी बोलले पाहिजे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्याच्या आंतरवाली सराटीहून निघालेले मनोज जरांगे अखेर आज मुंबईत पोहोचलेत. ते मुंबईत पोहोचण्यापूर्वीच त्यांचे हजारो समर्थक मुंबई व आझाद मैदानावर पोहोचले होते. यावेळी बाेलताना जरांगे म्हणाले, मुख्यमंत्र्यांना एकच विनंती आहे की आज कोट्यावधी लोक मुंबईत आणली आहेत. आम्हाला माज मस्ती नाहीय आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा आणि गोरगरीब मराठ्यांचा सामना करा. हे मराठे मरेपर्यंत तुम्हाला विसरणार नाहीत.
Jarange’s Demand is Illegal, Could Lead to Anarchy in Maharashtra, Warns Laxman Hake
महत्वाच्या बातम्या
- किती माजलाय तो जरांग्या, भाषा मग्रुरीची : गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबाेल
- मंत्र्याला काढण्याची घटनेतच तरतूद तर घटना दुरुस्ती कशासाठी, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
- न्यायदेवता अन्याय करणार नाही, मुंबईत जाणारच : मनाेज जरांगेंचा निर्धार
- एकेरी भाषा, आयाबहिणींवर अपशब्द खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनाेज जरांगेंना इशारा