विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्रातील बच्चा बच्चा फडणवीसांना ओळखतो. अशावेळी सपकाळ विचारतात, कोण देवेंद्र फडणवीस? खरं तर हे हास्यास्पद आहे. कारण कोण सपकाळ? असे जर लोकांना विचारला, तर मला वाटतं किती लोकं ओळखतील, हा प्रश्नच आहे, अशा शब्दांत भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची खिल्ली उडवली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत मत चोरीचा आरोप करत निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. यानंतर दोन दिवसांपूर्वीच कथित मत चोरी आणि बिहारमधील मतदार यादीतील अनियमिततेच्या आरोपांवरून लोकसभा आणि राज्यसभेतील इंडिया आघाडीचे एकूण 300 खासदारांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका करताना म्हटले होते की, राहुल गांधींकडे कोणतेही पुरावे नाहीत. ते हवेत गोळीबार करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेवर हर्षवर्धन सपकाळ यांनी कोण देवेंद्र फडणवीस असा प्रतिप्रश्न केला. यावर आता भाजपा नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार पलटवार केला आहे.
गिरीश महाजन म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना कोण ओळखत नाही. राज्यातील सर्वात तरुण महापौर ते होते. सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून या राज्याने त्यांना बघितलं आहे. सहा टर्म झाले, ते सतत निवडून येत आहेत. त्यांचे कार्य, कामाचा आवाका मुख्यमंत्री म्हणून तीन-तीन टर्म लोकांनी बघितलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बच्चा बच्चा फडणवीसांना ओळखतो. अशावेळी सपकाळ विचारतात, कोण देवेंद्र फडणवीस? खरं तर हे हास्यास्पद आहे. कारण कोण सपकाळ? असे जर लोकांना विचारला, तर मला वाटतं किती लोकं ओळखतील, हा प्रश्नच आहे, असे म्हणत महाजन यांनी खिल्ली उडवली.
गिरीश महाजन म्हणाले की, तुम्ही एकदा आमदार झालात आणि अपघाताने काँग्रेसचे अध्यक्ष झालात. यानंतर आता तुम्ही विचारतात, कोण देवेंद्र फडणवीस? मी त्यांना ओळखत नाही. त्यामुळे मला वाटतं की, यापेक्षा मोठं हास्यास्पद विधान असूच शकत नाही. सपकाळ यांनी यापुढे जबाबदारीने बोलावं. कारण ते काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. परंतु त्या काँग्रेसमध्ये कुणी राहायला तयार नाही. अशावेळी त्यांनी आधी त्यांचा पक्ष सांभाळावा. असे काही तरी फालतू विधान करू नये.
Girish Mahajan Mocks Harshvardhan Sapkal for Asking ‘Who is Devendra Fadnavis?’
महत्वाच्या बातम्या
- Amol Mitkari : आपल्या कार्यकर्तृत्त्वाची महती मंत्रालयात जोरदार रंगलीय, अमाेल मिटकरींचा राधाकृष्ण विखे- पाटील यांना धमकीवजा इशारा
- Allahabad High Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव मंजूर
- मनोज जरांगेंची चावी आणि रिमोट शरद पवार यांच्याच हातात, आमदार परिणय फुके यांचा हल्लाबाेल
- cabinet meeting : राज्यात १५ हजार पोलीस भरतीला मंजुरी, मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय