Gopichand Padalkar : 10 आमदारांवर राज्यसभा जिंकता येत नाही, गोपीचंद पडळकर यांचा शरद पवारांना टोला

Gopichand Padalkar : 10 आमदारांवर राज्यसभा जिंकता येत नाही, गोपीचंद पडळकर यांचा शरद पवारांना टोला

Gopichand Padalkar t

विशेष प्रतिनिधी

सोलापूर : Gopichand Padalkar राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांची सध्याची राज्यसभा खासदारकीची मुदत पुढील सहा महिन्यांत संपत आहे, , 10 आमदारांवर राज्यसभा जिंकता येत नाही, असा टोला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे.Gopichand Padalkar

माळशिरस येथील पाणीवमध्ये भाजप प्रवेश कार्यक्रमात गोपीचंद पडळकर म्हणाले, शरद पवार यांची खासदारकी 2026 मध्ये संपत असताना आता ते पुन्हा कोठून निवडून येणार आणि कसे निवडून येणार? केवळ 10 आमदारांवर राज्यसभा जिंकता येत नाही. त्यामुळे मला त्याची काळजी पडली आहे.Gopichand Padalkar



सोलापूर जिल्ह्यातच पवारांचे तुतारीवाले आमदार सर्वाधिक आहेत, पण तुतारीवाले सातत्याने भाजपच्या संपर्कात असतात आणि भेटीगाठी करत असतात. तुतारीवाले आमदार नेमके कुठे असतात हे तुम्हालाच माहित नाही. त्यामुळे शरद पवारांची 2026 मध्ये खासदारकी कशी येणार असा प्रश्न आपल्याला पडला असल्याचे पडळकर म्हणाले.

पंचायत राज निवडणुकीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये सत्ताधारी भाजपच्या विरोधात सर्व प्रमुख विरोधी पक्ष एकत्र आलेले दिसत आहेत. शरद पवार गटाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील, काँग्रेसचे भगीरथ भालके, अजित पवार गटाचे उपाध्यक्ष कल्याणराव काळे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे महेश साठे आणि मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी एकत्र येत भाजपविरोधी मोट बांधली आहे. सत्ताधारी भाजपचे आजी-माजी आमदार समाधान आवताडे व प्रशांत परिचारक यांच्या विरोधात विरोधकांसह महायुतीतील मित्रपक्षही एकत्रित आल्याने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे.

Gopichand Padalkar taunts Sharad Pawar, says Rajya Sabha cannot be won with just 10 MLAs

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023