विशेष प्रतिनिधी
सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या एका कार्यकर्त्याचे अपहरण करुन त्याला मारहाण करण्यात आली. मारहाणीचा मास्टरमाईंड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार असल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने चक्रे फिरवत अपहरण झालेला कार्यकर्ता शरणु हांडे याचा शोध लावला. त्यासोबतच पोलिसांनी अपहरण करणारा अमित सुरवसे याच्यासह त्याच्या सहा साथीदारांना अटक केली आहे. शरणू हांडे यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर आता उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
आमदार पडळकरांनी (Gopichand Padalkar) शरणू हांडेची भेट घेतली, यावेळी त्याने सांगितले की, तो पानटपरीजळ उभा होता. एक गाडी अचानक त्याच्याजवळ आली. त्यांनी थेट हल्ला करायला सुरुवात केली. पान टपरीसमोरच बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याच गाडीत टाकले आणि पाय बांधले. ते लोक त्याला कुठेतरी घेऊन जात होते. गाडीमध्ये सात लोक होते. त्यांच्या हातात कोयते, हॉकी स्टिक आणि तलवार होती. गाडीमध्ये टाकल्यानंतर आरोपींनी सतत मारहाण केली. त्यांनी कोणाला तरी व्हिडिओ कॉल केला होता, व्हिडिओ कॉलवर रोहित पवार होते. रोहित पवार हे मला अमित सुरवसेची माफी मागायला सांगत होते. मी माफी मागायला नाही म्हटलो तर त्यांनी याला घ्या असे म्हटले, असे शरणू हांडेने आमदार पडळकरांना सांगितले.
शरणू हांडेची भेट घेऊन पडळकरांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, 2017 मधील घटनेशी या अपहरण आणि मारहाणीचे तार जुळतात. जुन्या राजकीय वैमनस्यातून ही मारहाण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबतचे अमित सुरवसे याचे फोटो दाखवत पडळकर म्हणाले ह घटनेचे मास्टरमाईंड हे आहेत. एकाच घरातील लोकांसोबत या लोकांचे फोटो कसे असतात, असा सवाल करत शरद पवार गटावर पडळकरांनी आरोप केले.
Gopichand Padalkar’s worker kidnapped and beaten, Rohit Pawar accused of being the mastermind
महत्वाच्या बातम्या
- Dnyaneshwari Munde : महादेव मुंडे यांना ओळखत नव्हता तर पोलिसांना का कॉल केले? ज्ञानेश्वरी मुंडे यांचा सवाल
- Uddhav Thackeray हिंदूंना बदनाम करण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचा सवाल
- सच्चे भारतीय असाल तर अशी वक्तव्यं करूच शकत नाही…चीनबाबत आरोपांवरून सुप्रीम कोर्टानेच उपटले राहुल गांधींचे कान
- कोथरूड प्रकरणात पोलिसांवर कारवाई नाही; ती ओबीसी पीडित कोण ? रोहित पवारांचा पुणे पोलिसांना सवाल