विशेष प्रतिनिधी
नागपूर : फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक २०२५ ची विजेती आणि भारताच्या ८८ व्या ग्रँडमास्टर असलेल्या नागपूरच्या दिव्या देशमुख यांना महाराष्ट्र शासनाने विशेष सन्मान देऊन ३ कोटी रुपये रोख बक्षीस देऊन सन्मान केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा गौरव नागरी सन्मान सोहळ्यात नागपूर येथे पार पडला.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, सध्या खेळाला सर्वत्र व्यावसायिक रूप येत आहे. महाराष्ट्र शासन क्रीडा क्षेत्राला महत्व देत असल्याने देश पातळीवरील स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक वरचा राहतो. शासनाकडून खेळाडूंना चांगले फिजिओथेरपीस्ट, न्यूट्रिशियनिस्ट, देशी- विदेशी प्रशिक्षकांसह इतरही सोय देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पूर्वी आंतराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्यास जाणाऱ्या खेळाडूंसोबत प्रशिक्षकाला जाण्याची परवानगी नव्हती. तिथे खेळाडू महत्वाचा असतोच. पण त्याच्यासोबत प्रशिक्षक जाणे व इतरही सोयीसुविधा उपलब्ध असणे महत्त्वाचे असते. इतर देशातील खेळाडूंकडे या सगळ्या सोयी राहत असल्याने आपल्या खेळाडूला अडचणी यायच्या. त्यामुळे शासनाने नियमांत बदल केले. तसेच खेळाडूंना आता मोठ्या प्रमाणावर रोख बक्षीसही देणे सुरू केले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, प्रत्यक्षात खेळाडूला विविध स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मोठा खर्च लागतो. कुटुंबाला काही मर्यादा असते. त्यामुळे पैसे नसलेल्या खेळाडूंची गैरसोय होत होती. काही प्रकरणांत त्यांना स्पर्धेतही सहभागी होता येत नव्हते. पण शासनाने ही अडचण दूर करण्यासाठी रोख स्वरुपातील बक्षीसाच्या रकमेत वाढ केली. यामुळे कोणताही होतकरू खेळाडू पैशांअभावी खेळापासून वंचित राहणार नाही.
दिव्या देशमुखला मागच्या स्पर्धेतील विजेतेपनानंतर शासनाने 1 कोटी रुपयांचे बक्षिस दिले होते. आता 3 कोटी रुपयांचा धनादेश दिला आहे. हा धनादेश नकली दिसत असल्याने आता तो वठणार काय? हे पैसे केव्हा मिळणार? हा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होईल. पण प्रत्यक्षात हा चेक उधारी नाही, तर दिव्याच्या खात्यात शासनाने एक दिवस अगोदरच शुक्रवारीच RTGS च्या माध्यमातून 3 कोटी रुपये वर्ग केले आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दिव्या देशमुखनेही या सत्काराविषयी राज्य सरकारचे आभार मानले.
Grandmaster Divya Deshmukh honored with a cash prize of Rs. 3 crore
महत्वाच्या बातम्या
- Sadhvi Pragya Singh : भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देवच करेल शिक्षा, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा संताप
- एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना न्यायालयान कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा
- बांग्लादेशीयांची बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी टास्कफोर्स, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
- Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांच्या तमाशा शब्दावर मुख्यमंत्र्यांचा जाेरदार हल्लाबाेल, हा तर भारतीय सैन्याचा अपमान