विशेष प्रतिनिधी
नाशिक : भाजपाला जर खरेच छत्रपतींबद्दल अभिमान असेल तर कोरटकर, सोलापुरकरवर कठोर कारवाई करा आणि ‘बंच ऑफ थॉट’वर बंदी घाला,” अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sakpal) यांनी केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना सपकाळ म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राहुल सोलापूरकरच्या घराला पोलीस संरक्षण दिले जाते. प्रशांत कोरटकरने महाराजांचा अपमान केला. आता त्याच्यावर कारवाईचे नाटक सुरू आहे. पण या प्रवृत्तींना कोणाचे पाठबळ आहे? ते सर्वांना माहिती आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक गोळवलकर यांच्या ‘बंच ऑफ थॉट’ या पुस्तकातही छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत खालच्या स्तरावरील लिखाण केलेले आहे.
वक्फ सुधारणा विधेयक मंजूर करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असला तरी याच्याआडून पद्मनाभ मंदिरातील प्रचंड मोठ्या प्रमाणात असलेल्या सोन्यावर त्यांना डल्ला मारायचा आहे, असा आरोप करत सपकाळ म्हणाले, देशात महागाई प्रचंड वाढलेली असून मराठी शाळा बंद होत आहे. रोजगार नाहीत पण केंद्र सरकारने एक खेळणे हाती दिले असून आपण हातावर हात ठेवून पाहत बसलो आहोत, ते म्हणजे वक्फ बोर्ड. इंग्रजांनी दिल्लीत राजधानी वसवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी भू संपादन करताना प्रार्थना स्थळे सुरक्षित रहावीत अशी मागणी झाली. यावेळी 1913 मध्ये पुनर्वसनासाठी बनवलेल्या कायद्यातून वक्फ बोर्ड बनले. सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे सुरक्षित रहावित यासाठी ते बनवले होते, त्यात मंदिर, मशीद, गुरुद्वारा यांना विशेष अधिकार दिले होते. आता वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असला आहे. तसेच त्याआडून पद्मनाभ मंदिरातील प्रचंड मोठ्या प्रमाणात असलेल्या सोन्यावर त्यांना डल्ला मारायचा आहे. त्यासाठीच हा सर्व खेळ सुरू आहे.
Harshvardhan Sakpal demands ban on ‘bunch of thought’
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis महसूल विषयक सुधारित कार्यपद्धतींची अंमलबजावणी 15 ऑगस्टपासून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
- Raj Thackeray : मराठीचा आग्रह धरा, पण आंदोलन थांबवा, राज ठाकरे यांचे मनसैनिकांना आदेश
- Hasan Mushrif : पुण्यासारख्या घटना टाळण्यासाठी ‘महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना’ लागू करा, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी
- Sanjay Raut संजय राऊत यांनी सोडली टीकेची पातळी, मोदी शहांचा मियाँ म्हणून उल्लेख