विशेष प्रतिनिधी
जळगाव : Eknath Khadse एका तरी मुलीने तक्रार केली आहे का, की तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला किंवा बळजबरी करण्यात आली? पोलिसांकडे अशी एकही तक्रार नाही. जर हे सर्व संमतीने झाले असेल, तर त्यात कोणीही काय बोलणार? त्यामुळे या खासगी प्रकरणाला राजकारणाचे स्वरूप देऊ नये, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.Eknath Khadse
पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात जावई प्रांजल खेवलकर यांच्यावरील आरोपांवर खडसे म्हणाले की, , एका तरी मुलीने तक्रार केली आहे का, की तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला, बलात्कार झाला, तिचे फोटो काढले किंवा तिला डांबून ठेवले? अशी एकही तक्रार पोलिसांकडे आलेली नाही. जर हे सर्व संमतीने झाले असेल, तर त्यात तुम्ही काय बोलू शकता, असेही त्यांनी म्हटले. या प्रकरणातील घडामोडी पूर्णपणे खासगी असल्याचा दावा करत, खडसे यांनी आपल्या कुटुंबाचा यात संबंध नसल्याचे स्पष्ट केले.Eknath Khadse
खडसे यांनी या प्रकरणाला राजकारण आणि लोढा प्रकरणातून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. माझ्या जावयाला बाहेर जाऊन डग्स घ्यायला किंवा मुलींना बोलवायला मी किंवा माझी मुलगी रोहिणीताईने शिकवले नाही. उगाच राजकारणासाठी मला बदनाम केले जात आहे, असे त्यांनी सांगितले. विरोधकांना प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, तुमचे जावई किंवा मुलगे घराबाहेर गेल्यावर काय करतात, दारू पितात की अजून काही, हा त्यांचा खासगी प्रश्न असतो. कायद्यानुसार या प्रकरणाची चौकशी व्हावी, पण कोणताही पुरावा नसताना माझ्या कुटुंबाला यात ओढणे चुकीचे असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
एकनाथ खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गिरीश महाजन यांच्या अनेक सिड्या प्रफुल्ल लोढा यांच्याकडे आहेत, असा खळबळजनक गौप्यस्फोट खडसे यांनी केला. ते पुढे म्हणाले, माझ्या विरोधात आंदोलन करून जोडे मारण्याऐवजी गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढा यांना जोडे मारा. खडसे म्हणाले, मी एका पदाधिकाऱ्याला विचारले की आंदोलन का करत आहात? त्यावर तो म्हणाला की, वरिष्ठांचा आदेश आहे, म्हणून तुमच्या विरोधात आंदोलन करत आहोत. अशा प्रकारे त्यांनी भाजपवर खोचक टीका केली.
पुढे बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, विषारी पिल्लांना मी मोठे केले याचे मला दुःख वाटते, मी कधीही माझ्या जावयाचे समर्थन केले नाही. कुणाची एक तरी तक्रार आहे का? मग तरीदेखील रुपाली चाकणकर या कोणत्या आधारावर बोलत आहेत? माझं नाव सतत का घेता, माझा जावई आहे तो. तुमचा मुलगा घराबाहेर गेल्यावर तुम्हाला कळतं का? तो दारू पितो का ते? फक्त राजकारणात नाथा भाऊंना बदनाम करून हनी ट्रॅप-वरून लक्ष विचलित करणे हा उद्योग सध्या सुरू आहे. मात्र काहीही झाले तरी मी प्रफुल लोढाचा विषय सोडणार नाही, असा इशारा खडसे यांनी दिला आहे.
Has any girl complained about sexual assault or rape? Eknath Khadse’s question
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला