विशेष प्रतिनिधी
गडचिरोली : शरद पवार यांनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर इतक्या दिवसांनी आणि राहुल गांधी यांना भेटल्यानंतरच याची आठवण का आली? इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले.
राहुल गांधी जसे रोज सलीम-जावेदच्या स्क्रिप्ट सारख्या काल्पनिक कहाण्या सांगतात, तशीच अवस्था आता शरद पवारांची तर झालेली नाही ना? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन अनोळखी व्यक्ती दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेटायला आले होते. त्यांनी 160 मतदारसंघांमध्ये निश्चित विजय मिळवून देण्याचा दावा केला होता. यावर मुख्यमंत्री म्हणाले,
आजवर शरद पवारांनी कधीच ईव्हीएमवर शंका घेतली नव्हती, उलट त्यांनी नेहमीच स्पष्ट मत व्यक्त केले की, मतदान यंत्रावर दोष देणं योग्य नाही. मग आता अचानक मतदान प्रक्रियेतील त्रुटींची आठवण का झाली? राहुल गांधींच्या भेटीनंतरच का हे सगळं आठवलं?कितीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तरी आपल्या देशासारखी पारदर्शक निवडणूक कुठेही होत नाही, हे सर्वांना माहिती आहे.
हे जनतेसमोर बोलतात.निवडणूक आयोगाने बोलावले की जात नाही, म्हणतात आम्ही संसदेत शपथ घेतली आहे. कोर्टात आम्ही संसदेत शपथ घेतली आता शपथपत्र देणार नाही असे चालेल का? मग निवडणूक आयोगात तसे कसे चालू शकेल?
राहुल गांधी शपथपत्र देत नाही कारण त्यांना माहिती आहे आपण खोटे बोलत आहोत, आपले खोटं पकडले गेले आणि आपण शपथ पत्रावर दिले तर उद्या फौजदारी कारवाई होऊ शकेल.म्हणून रोज खोटं बोलून पळून जायचे, असे पळपुटे ही लोक आहेत, असा टोला मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे.
Hasn’t Sharad Pawar faced the same situation as Rahul Gandhi
महत्वाच्या बातम्या
- Dnyaneshwari Munde : महादेव मुंडे यांना ओळखत नव्हता तर पोलिसांना का कॉल केले? ज्ञानेश्वरी मुंडे यांचा सवाल
- Uddhav Thackeray हिंदूंना बदनाम करण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचा सवाल
- सच्चे भारतीय असाल तर अशी वक्तव्यं करूच शकत नाही…चीनबाबत आरोपांवरून सुप्रीम कोर्टानेच उपटले राहुल गांधींचे कान
- कोथरूड प्रकरणात पोलिसांवर कारवाई नाही; ती ओबीसी पीडित कोण ? रोहित पवारांचा पुणे पोलिसांना सवाल!