विशेष प्रतिनिधी
मुंबई : Karan Aur Johar बॉलीवूड निर्माता करण जोहर यांच्या नावाचा गैरवापर करत असल्याच्या कारणावरून ‘शादी के डायरेक्टर करण और जोहर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर दिलेला स्थगिती आदेश बॉम्बे उच्च न्यायालयाने बुधवारी कायम ठेवला.Karan Aur Johar
मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधे आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं की, करण जोहर यांचं नाव हे केवळ एक व्यक्तिचे नाव न राहता, ते आता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा व ब्रँडचा अविभाज्य भाग बनले आहे. त्यामुळे कोणताही तिसरा पक्ष त्यांच्या नावाचा व्यावसायिक लाभ घेऊ शकत नाही.
चित्रपटाच्या निर्मात्याने स्थगिती रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती, परंतु न्यायालयाने ती फेटाळून लावली. करण जोहर यांच्याविरोधात चित्रपट आणि त्याच्या नावावर स्थगिती मिळवण्यासाठी करण यांनी मार्च महिन्यात याचिका दाखल केली होती. त्यावर एकल खंडपीठाने प्रथम स्थगिती दिली होती.
न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना म्हटलं की – ‘करण’ आणि ‘जोहर’ ही नावं एकत्र आल्यास ती थेट करण जोहर यांच्याशी संबंधित असल्याचा समज निर्माण होतो. त्यामुळे त्यांचा ‘ब्रँड व्हॅल्यू’ वापरणं हे त्यांच्या वैयक्तिक आणि प्रसिद्धीच्या अधिकारांचं उल्लंघन ठरतं.
संजय सिंग या निर्मात्याने ‘करण और जोहर’ या नावा दरम्यान ‘और’ (आणि) हे शब्द जोडण्याची तयारी दाखवली होती, मात्र न्यायालयाने त्यालाही नकार दिला. न्यायालयाने स्पष्ट केलं की, अशा कोणत्याही स्वरूपात हे नाव वापरणं जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू शकतं.
भारतामध्ये न्यायालयांनी अनेक वेळा सार्वजनिक व्यक्तिमत्त्वांच्या वैयक्तिक आणि प्रसिद्धीच्या अधिकारांना मान्यता दिली आहे, असं सांगून न्यायालयाने करण जोहर यांचं नाव आणि व्यक्तिमत्त्व यावर त्यांना मालकी हक्क असल्याचं मान्य केलं.
High Court’s stay order on the release of the film ‘Shaadi Ke Director Karan Aur Johar’ remains in effect
महत्वाच्या बातम्या
- Operation sindoor वर मोदींचे मॉनिटरिंग; जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा, हिजबुल यांच्या म्होरक्यांना मारण्यासाठीच पाकिस्तानात 9 ठिकाणांवर भारताचे मिसाईल हल्ले!!
- Operation sindoor : पाकिस्तानात 3 ठिकाणी 9 टार्गेटवर भारताचा क्षेपणास्त्र हल्ला; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा घेतला बदला!!
- Devendra Fadnavis : अहिल्यादेवी यांचे जन्मगाव चौंडीचा तीर्थस्थळ म्हणून विकास करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
- Mahadev Jankar : भाजपने विचारले नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली, महादेव जानकारांची खंत