विशेष प्रतिनिधी
पनवेल : भारताचे पंतप्रधान आणि गृहमंत्री दोघेही गुजराती आहे. देशाचा गृहमंत्री ठणकावून सांगतो की मी हिंदी नाही, मी गुजराती आहे. मात्र जेव्हा आम्ही मराठीचा आग्रह धरला, मराठी बोललो की संकुचित कसे होतो? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
शेतकरी कामगार पक्षाच्या 78 व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी शेकापचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते.
राज ठाकरे म्हणाले की, शिवसेनेच्या मंचावर कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे आले होते. शिवसेना आणि कम्युनिस्ट हे एकाच मंचावर तसा हा दुर्मिळ योग होता. मात्र जेव्हा ते एका मंचावर आले तेव्हा जणू काही भगव्या मंचावर लाल ध्वज आल्यासारखे ते दृश्य होते. तेव्हाच्या राजकारणात आणि राजकारण्यांमध्ये संमजसपणा होता. आता जेव्हा शेकापच्या वर्धापनदिनानिमित्त मी येथे आलो आहे. तेव्हा शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत देखील आहेत. त्यामुळे लाल मंचावर दोन भगवे ध्वजे एकत्र आले आहेत.
राज ठाकरे म्हणाले, भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर ज्या पक्षाची स्थापना झाली तो पक्ष म्हणजे शेतकरी कामगार पक्ष. महाराष्ट्रात स्वतंत्र पूर्व काळात निर्माण झालेला हा एकमेव राजकीय पक्ष आहे. इतकी वर्षानंतर हे टिकून आहे हे आश्चर्य आहे.
शिवसेनेचे पहिलं अधिवेशन झालं त्यावेळी शिवसेना आणि कम्युनिस्ट यांच्यात भांडण नव्हे असे सांगून राज ठाकरे म्हणाले, त्यावेळी राजकारण मोठ्या मनाचे होते. आता हे मोठं मन संकुचित व्हायला लागले आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या प्रचारासाठी मी जयंत रावांसोबत होतो. राजकीय पक्ष असतात , निवडणुका होतात निवडणुका लढवल्या जातात. मात्र पक्षाचा विचार न करता महाराष्ट्र आणि जिल्ह्यांचा विकास तुम्ही समजून घेतला पाहिजे.
आतंकवाद भगवा न कभी था, ना है और ना…मालेगाव बाँबस्फोट निकालावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
हिंदीच्या मुद्द्यावर राज ठाकरे म्हणाले, राज्यकर्त्यांचे लक्ष नसेल तर तो प्रदेश बरबाद व्हायला वेळ लागत नाही महाराष्ट्रातलं सरकारी याकडे लक्ष न देता महाराष्ट्रातील नेते महाराष्ट्रात हिंदी कसा आणता येईल याकडे लक्ष देते पण महाराष्ट्रामध्ये मराठी कसं शिकवता येईल याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत उद्योगधंदे येत आहेत पण या उद्योग धंद्यामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरील लोक येतात. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प हे गुजरातला गेलेले आहेत. प्रत्येक राज्याला आपल्या राज्यातील प्रेम असतं मग आपण बोलल्यानंतर दुसऱ्या संकुचित का होतात? तुमची भाषा संपली आणि एकदा तुमची जमीन केली तर जगाच्या नकाशावरती तुम्हाला कुठे स्थान नाही. या रायगड मध्ये कोण जमिनी विकत घेत आहेत कोण येतंय कोण राहतंय काहीच माहित नाही. उत्तर भारतातील अनेकांनी महाराष्ट्रातल्या कोकणातील जमिनी विकत घेतल्यात आहेत. त्यांना समजत नाही की आता आपणही संपणार आहोत.
उद्योगांसाठी तुमच्या जमिनी विकत घेण्यासाठी आले तर नुसत्या जमिनी विकत घ्यायचा नाही तर त्या विकत घेणाऱ्या उद्योजकांच्या मध्ये तुम्ही राहायच असे आवाहन करून राज ठाकरे म्हणाले, उद्या याच मराठी आणि या महाराष्ट्रामध्ये मराठी आमदार खासदार नगरसेवक निवडून येतील. या ठिकाणी जेवढा विकास होत आहेत त्या ठिकाणी मराठी मुलं ही कामाला लागली पाहिजे. बाहेरची मुलं येणार आणि वाटेल तो थैमान घालणार. पण जमिनी बाबत राज्य सरकारने कायदा आणला. तुम्ही कोण आहात तर अर्बन नक्षल आहात. तुम्ही जर विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करेल.
How can the country’s Home Minister say that I am not Hindi, I am Gujarati ? Raj Thackeray’s question
महत्वाच्या बातम्या
- Sadhvi Pragya Singh : भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देवच करेल शिक्षा, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा संताप
- एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना न्यायालयान कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा
- बांग्लादेशीयांची बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी टास्कफोर्स, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
- Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांच्या तमाशा शब्दावर मुख्यमंत्र्यांचा जाेरदार हल्लाबाेल, हा तर भारतीय सैन्याचा अपमान