विशेष प्रतिनिधी
नाशिक : Chhagan Bhujbal मी फार फार तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जाऊ शकतो. पण हे नेते या प्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे जाणार असल्याचे मी ऐकले आहे, असा टाेला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन व शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांना पालक मंत्री पदाच्या वादावरून हाणला आहे.Chhagan Bhujbal
नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रिपद महत्वाचे मानले जात आहे. पत्रकारांनी याविषयी मंत्री दादा भुसे यांना छेडले असता त्यांनी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा विषय आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे न्यावा लागेल असे वाटते असे विधान केले. त्यानंतर पत्रकारांनी हा विषय मंत्री गिरीश महाजन यांच्यापुढे उपस्थित केला. यावर भुसेंना टाेला मारत महाजन म्हणाले, डोनाल्ड ट्रम्प व दादा भुसे यांचे घनिष्ठ संबंध असतील. कदाचित ते त्यांच्याशी बोलून प्रश्न सोडवतील.Chhagan Bhujbal
छगन भुजबळ यांनीही या प्रकरणी महाजन व भुसे या दोघांनाही उपरोधिक टोला हाणला आहे. पत्रकारांनी नाशिक येथे बोलताना जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी महाजन व भुसे हे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे जाणार आहेत का? असा प्रश्न केला. त्यावर भुजबळ म्हणाले, गिरीश महाजन व दादा भुसे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे जाणार असल्याचे मी ऐकले आहे. पण मी काही एवढ्या लांब जाऊ शकत नाही. मी आपला अजित पवार, देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्याकडे जाईल. फारच झाले तर मोदी साहेबांकडे जाईल. यापेक्षा लांब मी जाणार नाही. ती मंडळी जाऊ शकते.
भुजबळ म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वच जागांवर महायुतीमधील घटकपक्षांची युती होईल याची काहीही शाश्वती नाही. प्रत्येक ठिकाणी तिन्ही पक्षांची युती होईल असे काहीही नाही. तेथील परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घेतला जाईल. काही ठिकाणी भाजप बाजूला असेल आणि शिंदे व अजित पवारांची युती होईल. तर काही ठिकाणी भाजप व अजित पवारांची युती होईल, तिथे शिंदे बाजूला असतील असेही होऊ शकते. स्थानिक पातळीवर काहीही होऊ शकते.
यंदाच्या दिवाळीला आनंदाचा शिधा का नाही? या प्रश्नावर भुजबळ म्हणाले, आनंदाचा शिधा यावेळी काहीसा अडचणीत आहे. लाडकी बहीण योजनेसाठी यंदा सुमारे 45 हजार कोटींचा खर्च झाला. आता नैसर्गिक संकटामुळे शेतकरीही अडचणीत सापडलेत. त्यांना 32 हजार कोटी वाटायचे आहेत. त्यामुळे काही योजना अडचणीत आहेत. पण पुढच्या वेळी नक्की विचार करू.
I can’t go to Donald Trump for guardian minister post, Chhagan Bhujbal’s Mahajan-Bhuse tossed
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा