विशेष प्रतिनिधी
पुणे : केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आणि निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे. पुण्यातील जैन बोर्डिंग भूखंड व्यवहारावरून मागील काही दिवसांपासून निर्माण झालेल्या राजकीय वादावर त्यांनी स्पष्टीकरण दिले.
पत्रकार परिषदेत बोलताना मोहोळ (Murlidhar Mohol) म्हणाले, “मी गेल्या चार-पाच दिवसांपासून पुण्यात नव्हतो. मात्र माध्यमांमधून काही बातम्या पाहिल्या. मी हे स्पष्टीकरण राजू शेट्टी किंवा इतर कोणत्याही नेत्याला उद्देशून देत नाही, तर पुण्याच्या जनतेला देत आहे. ज्यांनी मला निवडून दिले, त्यांच्यासमोर सत्य स्पष्ट व्हावे म्हणून हे सांगत आहे. मला राजू शेट्टी यांच्याविषयी मोठा आदर आहे. पण एवढे गंभीर आरोप करण्याआधी त्यांनी माझ्याशी संपर्क साधला असता, तर मी सर्व बाबी स्पष्ट केल्या असत्या. मग असे गैरसमज निर्माण झाले नसते.”
http://youtube.com/post/UgkxBNJpolV187Jqj4lX6r3hSF37O-f7zIVe?si=12l204HRDxV09OxZ
भूखंड व्यवहाराबाबत त्यांनी स्पष्ट केले की, “जैन बोर्डिंग हाऊसच्या विक्री नोंदीनुसार हा भूखंड गोखले बिल्डर्स यांनी खरेदी केला आहे. मी गोखले बिल्डर्सचा भागीदार असल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. माझ्या लोकसभा निवडणूक अर्जामध्ये मी माझा व्यवसाय स्पष्टपणे नमूद केला आहे. शेती आणि बांधकाम या दोन्ही क्षेत्रांत मी काम करतो आणि त्यात काहीही लपवण्यासारखे नाही. गोखले बिल्डरबरोबर माझ्या दोन एलएलपी (LLP) संस्था होत्या, ज्या अनुक्रमे २०२२ आणि २०२३ मध्ये स्थापन केल्या होत्या. मी या दोन्ही संस्थांमधून २५ नोव्हेंबर २०२४ रोजी बाहेर पडलो, आणि त्या कालावधीत कोणताही व्यवहार झाला नव्हता. जैन बोर्डिंग हाऊसच्या ट्रस्टींनी १६ डिसेंबर २०२४ रोजी जमीन हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला, आणि सर्व प्रक्रिया पूर्ण करून ८ ऑक्टोबर २०२५ रोजी गोखले बिल्डर्सकडे जमीन हस्तांतरित झाली. म्हणजेच, मी त्या व्यवहारात कोणत्याही टप्प्यावर सहभागी नव्हतो.”
मोहोळ म्हणाले, “या प्रकरणात माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे, निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित आहेत. मी याबाबत सर्व कागदपत्रे सार्वजनिक करण्यास तयार आहे.”
I have nothing to do with the Jain Boarding House plot deal; Allegations are baseless, explains Murlidhar Mohol
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा