विशेष प्रतिनिधी
जालना : Manoj Jarange उपोषणामुळे माझं शरीर मला साथ देत नाही, पण अर्धवट आंदोलन करुन मरणार नाही, मराठ्यांना आरक्षण देऊनच मी मरणार, असा निर्धार मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी व्यक्त केला .Manoj Jarange
मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. ते म्हणाले की आता विजयाचा गुलाल घेऊनच मुंबईतून परतायचे. दहा ते बारा दिवसांची तयारी ठेवून मराठा बांधवांनी मुंबईकडे कुच करायचे आहे. मुंबईत एकाही मराठा बांधवाला काठी लागली किंवा त्यांच्या गाडीला काही झाले तर आमदारांचा कार्यक्रमच करणार.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर गेल्या काही वर्षांपासून मनोज जरांगे आंदोलन करत आहेत. आज त्यांनी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील महाकाळ येथे गोदाकाठच्या 123 गावांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी मराठा समाजाला मुंबईला जाण्याची तयारी ठेवा असे आवाहन केले. येत्या 29 ऑगस्टला मुंबईत जाण्याची तयारी करा, आजपासूनच तयारीला लागा असे आवाहन त्यांनी केले.
मनोज जरांगे म्हणाले की फडणवीसांनी आता दंगली घडवण्याचे डोक्यातून काढुन टाकावे. भुजबळांनी मराठा आरक्षणाला विरोध केला तर त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. देवेंद्र फडणवीस गुप्तपणे डाव टाकत आहे, असे मला मंत्री आणि अधिकारी सांगतात असाही आरोप जरांगेंनी यावेळी केला.
मनोज जरांगे म्हणाले की, फडणवीस हे छगन भुजबळच्या आड ओबीसी मराठा वाद लावून देण्याचे काम करत आहे. फडणवीसांनी अंतरवालीमध्ये हल्ला घडवून आणला. संतोष देशमुख प्रकरणातही सह आरोपी होऊ दिले नाही. कुणबी नोंदी सापडलेल्या लोकांना देवेंद्र फडणवीस मुद्दाम व्हॅलिडिटी होऊ देत नाही. अधिकाऱ्यांना सांगून काहीतरी त्रुटी काढण्यास फडणवीस सांगत आहे, असे गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर केले.
देवेंद्र फडणवीस यांना सरकार वाचवायचे आहे. पण मला माझे मराठा वाचवायचे आहे. वेळ पडली तर जीव गेला तरी चालेल पण समाजाशी गद्दारी करणार नाही. तुमच्या लेकरा बाळांसाठी आंदोलन करत आहे. ते मोठे झाले पाहिजे. यासाठी मी शत्रूत्व घेतलं आहे, असे ते म्हणाले.
I will die only by giving reservation to Marathas, says Maratha activist Manoj Jarange
महत्वाच्या बातम्या
- Harshvardhan Sapkal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका
- Sophia Qureshi : बेजबाबदार पाकिस्तान, भारतावर हल्ला करत असतानाही सुरू ठेवली नागरी विमानसेवा, कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती
- Rashtriya Swayamsevak Sangh : देशविरोधी षड्यंत्रांना यश मिळू देऊ नका! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशवासीयांना आवाहन
- IPL 2025 Postponed : भारत-पाकिस्तान तणावाचा आयपीएलला फटका, स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित