विशेष प्रतिनिधी
मुंबई : राजकीय पक्षांना निवडणूक आयोग मतदार याद्या दाखवतच नसेल तर पहिला घोळ तेथेच आहे असा आरोप करत मतदार याद्यांमध्ये सुधारणा होत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.
विरोधकांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज दुसऱ्या दिवशीही निवडणूक आयोगाची भेट घेतली. यानंतर शिवालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे म्हणाले, मला अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्यासमोर आणि राज्याच्या जनतेसमोर ठेवायची आहे. निवडणूक म्हटली की राजकीय पक्ष आले आण महाराष्ट्रातला मतदार आले. निवडणूक आयोग हे फक्त निवडणुका घेतात. पण राजकीय पक्ष निवडणुका लढवतात. राजकीय पक्षांना जर निवडणूक आयोग मतदार याद्या दाखवतच नसेल तर मला वाटतं की पहिला घोळ इथे आहे.
मतदारयादीतील घोळाचे उदाहरण देताना राज ठाकरे म्हणाले, २०२४ च्या निवडणुका होण्याच्या आधी आणि निवडणूक झाल्यानंतरच्या दोन याद्या तुम्हाला दाखवतो. २०२४ च्या निवडणुका झाल्या त्यावेळी मतदारांची यादी त्यातला तपशील मी वाचून दाखवतो. त्यावरुन तुम्हाला कल्पना येईल.
मतदारसंघ १६०. कांदिवली पूर्व, मतदाराचं नाव धनश्री कदम, वडिलांच नाव दीपक कदम वय वर्षे २३, आता वडिलांच ंनाव दीपक कदम, त्यांच्या वडिलांच नाव रघुनाथ कदम, वय वर्षे ११७, मतदार संघ १६१ नाव नंदिनी चव्हाण, वडिलांच नाव महेंद्र चव्हाण वय वर्षे १२४, वडिलांच तपशील नाव महेंद्र चव्हाण, वडिलांच नाव श्रीनाथ चव्हाण वय ४३. कुणी कुणाला जन्म दिलाय तेच कळत नाही. २०२४ च्या निवडणुकीच्या आधीचा हा घोळ. २०२४ च्या निवडणुकीनंतर निवडणूक आयोगाने नवे जाहीर केली. त्यात फक्त नावे आहेत. फोटो नाही, पत्ते नाहीत काहीही नाही. आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेले तेव्हा त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे बोट दाखवलं.
राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बोट दाखवलं. दोघंही प्रतिनिधी केंद्रीय निवडणूक आयोगाचेच आहे. महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना मतदार याद्या न दाखवून तुम्हाला काय मिळणार असा सवाल करत राज ठाकरे म्हणाले, आम्ही आत्ता त्यांना हेच सांगितलं आहे की मतदार याद्यांमध्ये सुधारणा होत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागची पाच वर्षे झालेल्या नाहीत. याद्या सुधारण्यासाठी अजून सहा महिने गेले तर काय फरक पडतो? आमची भेट झाल्यानंतर त्यांनी नोटिफिकेशन काढलं. त्यांनी आठ दिवसांची मुदत राजकीय पक्षांना दिली आहे. निवडणूक आयोग सहा, आठ महिने घेणार आम्ही आठ दिवसांत काय निर्णय घेणार? आम्ही नोटिफिकेशन रद्द करण्याची मागणी केली आहे. आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार ते पाहून आम्ही पुढची भूमिका ठरवू
If political parties are not shown voter lists, the first mess will be there, alleges Raj Thackeray
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा