विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : Satej Patil निवडणूक आयोगाने ठरविल्यास राज्यात एक कोटींपेक्षा अधिक दुबार नावे मतदार यादीतून कमी होऊ शकतात, असा दावा काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी केला.Satej Patil
निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना पाटील म्हणाले की इलेक्शन मॅन्युअलमध्ये स्पष्ट सूचना आहेत दुबार मतदार असतील तर ते कोणत्या पद्धतीने काढले पाहिजेत. केंद्रीय निवडणूक आयोगाचे वेगळं सांगतात, तर राज्य निवडणूक आयोग मॅन्युअल वेगळं सांगत आहे. त्यामुळे एकूणच संभ्रमावस्था निर्माण करायची आहे.Satej Patil
सतेज पाटील यांनी सांगितले की, राज्यामध्ये किमान एक कोटीपेक्षा अधिक नावे मतदार यादीतून बाजूला होतील. त्यामुळे मतदार बूथवरील लोड कमी होईल आणि यंत्रणा सुद्धा कमी लागेल. जर राजकीय पक्ष राज्यातील दुबार नावे शोधून काढत असेल, तर निवडणूक आयोगाला अधिकृत काढायला काय अडचण आहे अशी विचारणा त्यांनी केली. एखादा निवडणुकीत पडलेला किंवा निवडून आलेला उमेदवारही तुम्ही दिलेल्या डाटावरूनच संपूर्ण माहिती काढत असतो, तर मग आम्ही काढत असेल तर तुम्हाला का जमत नाही? अशी विचारणा त्यांनी केला. ते म्हणाले की निवडणूक आयोगाने जर ठरवलं तर 48 तासात दुबार मतदार यादीतून कमी होऊ शकतात.
कोल्हापुरातील खराब रस्त्यांविरोधात कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेच्या पार्श्वभूमीवर बोलताना पाटील म्हणाले की कोल्हापूरमधून सर्वाधिक टॅक्स जातो. महाराष्ट्रात तिजोरीत कोल्हापूरकरांचा सिंहाचा वाटा आहे. कोल्हापूरमध्ये शंभर कोटीचे रस्ते आले ते सुद्धा व्यवस्थित करण्यात आले नाहीत. कोल्हापुरातील खड्डे भरण्यासाठी शासनाने तत्काळ 50 कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली. 50 कोटी मुख्यमंत्र्यांनी द्यावेत आणि त्यांचा एक माणूस खड्डे भरले की नाही ते तपासण्यासाठी पाठवावा. इथं काय होते या अखंड कोल्हापूरला माहिती आहे.
If the Election Commission decides, the number of names will be reduced by two in 48 hours; Satej Patil claims
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा