विशेष प्रतिनिधी
बीड : तुम्ही जर महादेव मुंडे यांना ओळखत नव्हता तर पोलिसांना का कॉल केले? डीवायएसपी चोरमले यांच्यासमोर मला गोविंद यलमाटे म्हणाले की मला बंगल्याहून फोन आला तपास थांबवा. ओळख नव्हते तर मग तपास का थांबवला? असा सवाल महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला आहे. Dnyaneshwari Munde
बीडच्या महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचा हात असल्याचा आरोप बाळा बांगर यांनी केला होता. तसेच वाल्मीक कराडची मुलं सुद्धा या हत्येत सहभागी असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता. परंतु, कराडचा मुलगा सुशील कराडने हे सर्व आरोप फेटाळून लावत आपण महादेव मुंडे यांना ओळखच नव्हतो, असा दावा केला आहे.
ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या, मी पहिल्यापासून सानप यांच्या सीडीआरची मागणी करत आहे. तसेच भास्कर केंद्रे यांचेही सीडीआर काढण्यात यावे अशी माझी मागणी आहे. ठाकूर यांच्यासहित डीवायएसपी कविता नेहरकर यांचाही सीडीआर काढण्यात यावा. मी माझ्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, त्यांनी काय करावं ते त्यांनी ठरवावे. सुप्रिया ताईंनी देशासमोर मागणी केली आहे की या प्रकरणात सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे. जेव्हा मी आणि माझा भाऊ हॉस्पिटलमध्ये होतो, तेव्हा माझ्या वडिलांकडे एक व्यक्ती आला त्यांनी सांगितलं, ताईच्या नावाने मी फ्लॅट करतो मीडिया ट्रायल बंद करा. या व्यक्तीचे नाव मी पंकज कुमावत साहेबांना सांगणार आहे,
सुशील भैय्या, मी व माझे वडील आणि मध्यस्थी आम्ही सोबत बसून तपास करणार आहोत की या मध्यस्थीचा काही प्लॅन होता का? मुख्यमंत्र्यांना आम्ही नाव सांगितले आहे. यांची एवढी दहशत आहे की हे मध्यस्थाला पण काहीही करू शकतात, अशी भीती ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
परळी येथे एपीआय असलेले दहिफळे यांचे प्रमोशन शिरसाळा येथे झाले. त्यावेळी खुद्द गोट्या गित्तेने त्यांचा सत्कार केला होता. जे खरोखर आरोपी आहेत त्यांनाच कडक शासन झाले पाहिजे. जेव्हा मी या प्रकरणात खोलात गेले तेव्हा मला आरोपीचे नाव निष्पन्न झाले. पोलिस अधिकारी सकपाळ यांनी या आरोपीचे नंबर माझ्या भावाकडे दिले होते असा गौप्यस्फोट ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला आहे.
वाल्मीक कराडचा मुलगा सुशील कराडने म्हटले होते की, महादेव मुंडे हत्या प्रकरणात होत असलेले आरोप खोटे आहेत. महादेव मुंडेंना आम्ही कधीही ओळखत नव्हतो. ना मी त्यांना कधी पाहिले होते, ना माझ्या भावाने त्यांना कधी पाहिले होते तसेच ना माझ्या वडिलांनी त्यांना कधी पाहिले होते.
If you didn’t know Mahadev Munde, why did you call the police? Dnyaneshwari Munde questions
महत्वाच्या बातम्या
- Sadhvi Pragya Singh : भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देवच करेल शिक्षा, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा संताप
- एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना न्यायालयान कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा
- बांग्लादेशीयांची बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी टास्कफोर्स, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
- Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांच्या तमाशा शब्दावर मुख्यमंत्र्यांचा जाेरदार हल्लाबाेल, हा तर भारतीय सैन्याचा अपमान