विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे सर्वसामान्यांची जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान या अतिवृष्टीने झाले आहे. दोन आठवडे उलटून गेल्यानंतर देखील अजूनही जनसामान्यांचे पुनर्वसन झालेले नाही. महाराष्ट्र शासनाने पंचनामे करून त्या त्या ठिकाणी मदतीची घोषणा देखील केली आहे. exam fees
परंतु या अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अद्यापही कुठलीही मदत अथवा दिलासा देण्यात आलेला नाही. पुणे व नाशिक सारख्या जिल्ह्यांमध्ये मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी स्थलांतरित झाले आहेत, या भागात अतिवृष्टीचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. अहिल्यानगर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले आहे यामध्ये मुख्यतः सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क सरसकट माफ करावे तसेच ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरले आहे त्यांना सरसकट परतावा देण्यात यावा यासाठी आंदोलन करण्यात आले.
यानंतर पुणे विद्यापीठाने लेखी स्वरूपात पत्र देऊन सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क सरसकट माफ करण्यात येईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले आहे. याची अंमलबजावणी लवकरात लवकर न झाल्यास अभाविप अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा पुणे महानगरमंत्री राधेय बाहेगव्हानकर यांनी दिला आहे.
In the wake of the heavy rains, students will be given a full refund of their exam fees
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा