विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोणाचं ओरबडून कोणाला द्यावे, ही महाराष्ट्राची परंपरा नाही. ओबीसीतून द्यायचे असेल तर ओबीसीचा कोटा वाढवला पाहिजे. कोटा वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारकडे आहे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेनी मागणी केली. Sharad Pawar
मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण दिले पाहिजे, या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज मनोज जरांगे यांची भेट घेतली. शशिकांत शिंदे म्हणाले की, मनोज जरांगे यांची हैदाराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीवर ते ठाम आहेत. सरकारला ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य नसेल तर त्यांनी ओबीसीचा कोटा वाढवावा. कोटा वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारकडे आहे.
केंद्रातही यांच्याच विचारांचे सरकार आहे. त्यामुळे सरकारने असा निर्णय घ्यावा.आम्हाला या प्रश्नात कोणतेही राजकारण करायचे नाही. हा प्रश्न मार्गी लावावा एवढेच आमचे म्हणणे आहे. सरकारने जर विरोधी पक्षाला चर्चेला बोलावले तर आमची चर्चेची तयारी आहे. चर्चेतून काहीना काही तोडगा निघेल. ओबीसीतून आरक्षण द्यावे की नाही, असे फक्त आम्हाला सत्ताधाऱ्यांकडून विचारले जाते. आमच्यावर आरोप केला जातो, आणि आम्हाला चर्चेलाही बोलावले जात नाही. आम्हाला चर्चेला बोलवा, त्यातून काही तोडगा निघेल.
शरद पवारांनी भूमिका मांडावी अशी मागणी सत्ताधारी करत आहे, यावर शशिकांत शिंदे म्हणाले की, शरद पवार सत्तेमध्ये आहेत का? निर्णय त्यांना घ्यायचा आहे का? निर्णय सत्ताधाऱ्यांना घ्यायचा आहे. त्यामुळे ते उगाच काहीही बोलत आहेत.
मनोज जरांगे यांची मागणी ओबीसीतून आरक्षण दिले पाहिजे ही आहे. ओबीसीमधून आरक्षण देणे शक्य नाही तर सरसकट हा शब्द काढून मराठ्यांना आरक्षण द्यावे. आम्ही सरकारला म्हटलेले आहे की ताबडतोब चर्चा केली पाहिजे. सरकारने तयारी दाखवली तर आम्ही चर्चेला आताही तयार आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.
Increase quota and provide Maratha reservation from OBCs, says Sharad Pawar group
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांनी आम्हाला ज्ञान शिकवू नये, राधाकृष्ण विखे पाटील यांचा टोला
- शरद पवार भेटीला पोचणार म्हटल्याबरोबर मनोज जरांगे ताठ; उर्मट भाषेत फडणवीसांच्या पाठोपाठ राज ठाकरेंवर निशाणा!!
- मनोज जरांगे प्रमाणिक, पण त्याचा वापर, रोहित पवारांकडून रसद, नितेश राणे यांचा आरोप
- स्वतःचं पोरगं निवडणुकीत पाडलं, कधीपर्यंत भाजपची री ओढणार? मनाेज जरांगे यांचा राज ठाकरेंना सवाल