विशेष प्रतिनिधी
मुंबई : सोशल मीडियावर सतत चर्चेत असलेला ऑरहान अवात्रमणी, म्हणजेच ‘ऑरी’, पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. मुंबई पोलिसांनी तब्बल २२५ कोटींच्या ड्रग्ज रॅकेट प्रकरणात त्याला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स दिले आहेत.
ऑरीने अँटी नॉरकोटिक्स सेलच्या घाटकोपर युनिटसमोर हजर राहावे, असे आदेश देण्यात आले आहेत. वाढत्या ड्रग्ज नेटवर्कच्या तपासात त्याचे जबाब नोंदवले जाणार आहेत. मुंबई पोलिसांची अँटी नॉरकोटिक्स सेल गेल्या काही महिन्यांपासून या रॅकेटच्या मागावर असून, मोठे समन्स आणि अनेक अटकांच्या माध्यमातून कारवाईचा फास आवळत आहे. ऑरीची सोशल मीडियावर मोठी ओळख आणि मनोरंजन क्षेत्रातील संपर्क पाहता, पोलिस त्याचे या प्रकरणातील कोणतेही संभाव्य संबंध, संवाद किंवा माहिती तपासणार आहेत.
हा ऑरीवरचा पहिलाच वाद नाही. मार्च महिन्यात जम्मू कश्मीर पोलिसांनी त्याच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल केला होता. कटरा येथील एका हॉटेलमध्ये दारूचे सेवन केल्याचा आरोप होता. कटरा हा माता वैष्णोदेवी यात्रेसाठी धार्मिक संवेदनशील परिसर मानला जातो आणि अनेक ठिकाणी दारू तसेच मांसाहार कडक बंदी असते.
तक्रारीवरून नोंदवलेल्या एफआयआरमध्ये पोलिसांनी म्हटले होते की, “काही पाहुण्यांनी दारू पिल्याची माहिती मिळाल्यानंतर १५ मार्च रोजी ऑरहान अवात्रमणी आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. परिसरात दारू पूर्णतः बंदी असूनही त्यांनी नियम मोडले.”
Influencer Ori summoned for questioning by Mumbai Police in Rs 225 crore drug racket case
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : प्रो बैलगाडा लीग सुरू करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घाेषणा
- Sharad Pawar : काॅंग्रेसला ठाकऱ्यांचा नकाे हात, शरद पवारांची घेणार साथ
- संविधानिक संस्थांवर काँग्रेसच्या हल्ल्यांचा निषेध, २७२ माजी अधिकारी व न्यायमूर्तींचे खुले पत्र
- सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयावर महापालिका – जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य, नाेटिफिकेशन काढण्यासाठी थांबण्याचे न्यायालयाचे निर्देश



















