Manoj Jarange : भुजबळ सरकारचे मालक आहेत का? दगाफटका केला तर सुफडासाफ : मनाेज जरांगे यांचा इशारा

Manoj Jarange : भुजबळ सरकारचे मालक आहेत का? दगाफटका केला तर सुफडासाफ : मनाेज जरांगे यांचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : छगन भूजबळ काय सरकारचे मालक आहेत का त्यांचे ऐकून सरकारने निर्णय घ्यायला. पण सरकारने दगा फटका केला तर फडणवीस यांचा सुपडा साप होईल, असा इशारा मराठा आंदाेलक मनाेज जरांगे यांनी दिला आहे.



पत्रकारांशी बाेलताना भुजबळ यांच्या नाराजीवरून मनाेज जरांगे यांनी निशाणा साधला. ते म्हणाले,
मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याचा आणि प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी शासनाने नवा जी.आर. काढला. मात्र याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात दगा फटका केला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सुपडा साप होईल. मराठा समाजासाठी मंत्रीमंडळ उपसमिती आहे. तशीच उपस्थिती ओबीसी समाजासाठी उपसमिती स्थापन करण्यात आली. बरं झाले, सरकारने आता मायक्रो ओबीसी, अनुसूचीत जाती आणि जमाती प्रवर्गासाठीही उपसमित्या स्थापन करा, अशी टीकाही त्यांनी केली.

जरांगे पाटील म्हणाले की, हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यात आल्याने मराठवाड्यातील मराठा समाज ओबीसीमध्ये जाईल. तर औध संस्थानाचा गॅझेटियअरनंतर पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाचा फायदा होईल. आता हे गॅझेटियर लागू झाल्याने समाजाला ओबीसी प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शासनाच्या मराठा आरक्षणासंदर्भात काढण्यात आलेल्या जी.आर.वर विनाकारण संभ्रम निर्माण करण्यात येत आहे. आपल्याला काहीच मिळाले नाही,अशी बोंब कोणीही मारू नये. अभ्यासकांना मुंबईत बोलावले होते. मात्र आता त्यांना बोलवणार नाही, मी माझाच निर्णय घेणार आहे. ते केवळ टीव्हीवर बोलायला पुढे असतात. आज तुम्ही टीका करत आहात आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे आंदोलन केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला याविषयी विचारले असता जरांगे म्हणाले की, राऊत आणि शिंदे यांच्यावर राजकीय टीका आहे. मला जर फडणवीस यांना अडचणीत आणायचे असते तर थेट वर्षा बंगल्यावर गेलो असतो. मी केवळ समाजासाठी तेथे गेलो. मला कोणत्याही राजकीय पक्षाशी देणेघेणे नाही. मी कशाला कोणाला माझ्या खांद्यावर बंदूक ठेवू देऊ?

Is Bhujbal the Owner of the Government? Manoj Jarange Warns of Clean Sweep if Betrayed

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023