विशेष प्रतिनिधी
मुंबई : गुजराती व्यापारी मोर्चा काढू शकतात पण मराठी माणसाला मोर्चाची परवानगी मिळत नाही. ही आणीबाणी नाही तर काय आहे. महाराष्ट्रात मराठी माणसाला मोर्चा काढू दिला जात नाही. हा महाराष्ट्र आहे की गुजरात? असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केला आहे.
मीरा-भाईंदरमध्ये सुरु असलेला मराठी अमराठी वादानंतर मनसेने मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाआधी मनसे नेते अविनाश जाधव यांना ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनाही पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मात्र मोर्चा निघणारच असे सांगताना संदीप देशपांडेंनी (Sandeep Deshpande) म्हणाले, आमच्या नेत्यांना अटक केली तर मोर्चा निघणार नाही, असे सरकारला वाटते का? मराठी माणूस या मोर्चाचे नेतृत्त्व करेल.राज्यात मराठी-अमराठी वाद नाही, भारतीय जनता पक्षाचे लोक जाणीवपूर्वक माथी भडकवण्याचे प्रयत्न आहे. खासदार निशिकांत दुबेंचे वक्तव्य चिथावणीखोर आहे. महाराष्ट्रात दंगली भडकवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
मराठीच्या मुद्द्यावरून आज (मंगळवार) मनसेकडून मीरारोड येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आज होणाऱ्या मराठी मोर्चाच्या अगोदरच ठाणे पोलिसांनी मंगळवारी पहाटे 3.30 वाजता अविनाश जाधव यांना त्यांच्या ठाण्यातील निवासस्थान येथून ताब्यात घेतले आहे. यानंतर मनसे नेते आक्रमक झाले. संदीप देशपांडे यांनी आज माध्यमांसोबत बोलताना सांगितले की, मीरा भाईंदरमध्ये मोर्चा निघणारच आहे. सामान्य मराठी माणूस मोर्चाचे नेतृत्त्व करणार आहे. मात्र भाजप जाणीवपूर्वक माथी भडकवण्याचे प्रयत्न करत आहे. बिहार विधानसभा आणि महापालिका निवडणुकांसाठी ते मराठी-अमराठी वाद निर्माण करत आहेत. महाराष्ट्रात मराठी अमराठी वाद निर्माण करुन भाजपला निवडणुका जिंकायच्या आहेत. त्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून जाणीवपूर्वक माथी भडकवण्याचे प्रयत्न होत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून हे दंगली घडवण्याचे षडयंत्र आहे. भाजपने आतापर्यंत दंगली घडवूनच निवडणुका जिंकल्या आहेत. मराठी विरुद्ध अमराठी दंगली घडवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपच्या दंगलखोर नेत्यांना महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत, असा आरोप त्यांनी केला.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे पोलीस प्रयत्न करणार आहेत. नागरिकांना आवाहान आहे की, कोणीही मोर्चाच्या ठिकाणी येऊ नये असे पोलिसांनी सांगितले आहे.
Is this Maharashtra or Gujarat? Sandeep Deshpande’s angry question after I denied permission for MNS’s march
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी