विशेष प्रतिनिधी
सांगली : भारतीय संस्कृतीचा वारसा जपत आणि लोकभावनांचा सन्मान करत मोदी सरकारने सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव अधिकृतपणे ‘ईश्वरपूर’ करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयाने अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक आणि हिंदू संघटनांनी केलेली मागणी पूर्णत्वास गेली आहे.
या नामांतराला फक्त प्रशासकीय बदल मानले जात नसून, तो हिंदू अस्मिता आणि भारतीय संस्कृतीच्या गौरवाचे पुनर्स्थापन म्हणून पाहिला जात आहे. इस्लामपूरचे नाव बदलून ‘ईश्वरपूर’ करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्रातील भाजपा-महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवला होता. अखेर केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळताच, आज हा ऐतिहासिक निर्णय अमलात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून इस्लामपूरच्या नामांतराची मागणी गेली अनेक वर्षांपासून केली जात होती. या मागणीला धार्मिक आणि सांस्कृतिक भावनेचा आधार असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, ‘इस्लामपूर’ हे नाव स्थानिक परंपरा आणि वारशाशी सुसंगत नव्हते. त्यामुळे या बदलाने शहराला त्याची मूळ सांस्कृतिक ओळख पुन्हा मिळाली आहे.
या प्रस्तावाला राज्यातील भाजपा-महायुती सरकारने गांभीर्याने घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी केंद्राशी संपर्क साधून या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला. अखेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने लोकभावनांचा सन्मान राखत ‘ईश्वरपूर’ हे नाव अधिकृत केले आहे.
या निर्णयाचे स्वागत करत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि धार्मिक संघटनांनी आनंद व्यक्त केला आहे. हा निर्णय हिंदू अस्मिता आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक आहे. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर हा ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
दुसरीकडे, विरोधकांनी या निर्णयावर टीका केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या नेत्यांनी सरकारवर “नामांतराच्या राजकारणाद्वारे लोकांचे लक्ष मूलभूत प्रश्नांवरून विचलित करण्याचा प्रयत्न” असा आरोप केला आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांचे म्हणणे आहे की हा निर्णय राजकारणासाठी नव्हे, तर संस्कृती आणि परंपरेच्या सन्मानासाठी घेतला गेला आहे.
Islampur Renamed as ‘Ishwarpur’; Modi Government Approves Move Upholding Hindu Identity and Cultural Heritage
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात शिंदे – ठाकरे गटाचे नेते साथ साथ, रवींद्र धंगेकर यांना वसंत मोरेंचा पाठिंबा
- व्हिजन डॉक्युमेंट साकारणार विकसित भारताचे स्वप्न : मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- तर सर्वांची धार्मिक स्थळे अशीच लाटली जातील, जैन बोर्डिंग प्रकरणावरून रवींद्र धंगेकर यांचा इशारा
- औरंगजेबाच्या कबरीजवळ दिवा लावून दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस घ्या..



















