विशेष प्रतिनिधी
जत : jayant patil राज्याच्या विधानसभा सभागृहात रेकॉर्डवरील गुन्हेगार दाखल झाल्यामुळे सभागृहात विचार मांडणेदेखील अवघड झाले आहे, अशी टीका आमदार जयंत पाटील यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर केली आहे.jayant patil
जत येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यान व पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.jayant patil
जयंत पाटील म्हणाले की, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे कमी शिकले असले तरी त्यांनी जागतिक स्तरावरचे दर्जेदार साहित्य समाजाला दिले. त्यांच्या साहित्याचा अनुवाद तब्बल सत्तावीस भाषांमध्ये झाला आहे. त्यांच्या लेखनात तारतम्य, तोल व शालिनता होती. अलीकडे जतकरांना अरेरावीची भाषा ऐकावी लागत आहे. काहीजण स्वतःच्या गावात नाही तर दुसऱ्या भागातून 40 ते 50 हजार मतांनी निवडून येतात हे शंकास्पद आहे. त्यामुळे हे निवडणूकाचे निकाल खरे आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो आहेjayant patil
वसंतदादा पाटील ते पतंगराव कदम यांनी देखील भाषेची शालिन परंपरा कायम ठेवली. सांगली जिल्ह्याने ही परंपरा टिकवून ठेवली असून, अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त होत असलेल्या व्याख्यान व पुरस्कार सोहळ्यात या परंपरेचे स्मरण करणे महत्त्वाचे आहे. असंही जयंत पाटील म्हणाले.
विश्वजित कदम यांनी आपल्या भाषणात सांगितले की, अण्णा भाऊंनी प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून महाराष्ट्राच्या मातीत वैचारिक चळवळ उभी केली. जाती-धर्माच्या भिती मोडून काढून समाजात एकता निर्माण केली. त्यांनी जागतिक दर्जाचे साहित्य निर्माण केले असून, त्यासाठी त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळालाच पाहिजे.
It is difficult for a criminal with a record in the Legislative Assembly to even express views in the House: Jayant Patil criticizes Padalkar
महत्वाच्या बातम्या
- किती माजलाय तो जरांग्या, भाषा मग्रुरीची : गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबाेल
- मंत्र्याला काढण्याची घटनेतच तरतूद तर घटना दुरुस्ती कशासाठी, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
- न्यायदेवता अन्याय करणार नाही, मुंबईत जाणारच : मनाेज जरांगेंचा निर्धार
- एकेरी भाषा, आयाबहिणींवर अपशब्द खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनाेज जरांगेंना इशारा