Gopichand Padalkar : उद्धव ठाकरेंसारखा मुलगा बाळासाहेब ठाकरे यांच्या पोटी जन्माला यावा ही दुर्दैवाची गोष्ट, गोपीचंद पडळकर यांचा घणाघात

Gopichand Padalkar : उद्धव ठाकरेंसारखा मुलगा बाळासाहेब ठाकरे यांच्या पोटी जन्माला यावा ही दुर्दैवाची गोष्ट, गोपीचंद पडळकर यांचा घणाघात

gopichand padalkar and uddhav thackeray

विशेष प्रतिनिधी

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पुन्हा एकदा शिवसेना (ठाकरे गट) आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका करत तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. “बाळासाहेब ठाकरे हे संपूर्ण देशात हिंदुत्ववादी नेते म्हणून आदरणीय होते, मात्र त्यांचाच मुलगा मतांसाठी दाढ्या कुरवाळतो, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. बाळासाहेबांसारख्या तेजस्वी नेत्याच्या पोटी उद्धव ठाकरेसारखा मुलगा जन्माला यावा ही खरोखरच दुर्दैवी गोष्ट आहे,” असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.



पडळकर म्हणाले की, “उद्धव ठाकरेंच्या काळात त्यांच्याकडे लाल दिव्याच्या गाड्यांची वर्दळ असायची. मात्र आज त्यांच्या घरी कोणी फिरकत नाही. अशावेळी त्यांनी भाजपावर टीका करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे. जनतेने त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे आणि त्यामुळे त्यांची मानसिकता खचली आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनीही त्यांच्याकडे फार लक्ष देऊ नये.”

संजय राऊतांना सुनावताना पडळकर म्हणाले की, संजय राऊत हे अडचणीत आहेत. त्यांना काही पूजा करायची असेल, तर त्यांनी मला सांगावे. संजय राऊत यांना जर चांगली पूजा घालायची असेल, तर मी त्यांना बगलामुखीची पूजा घालून देतो. संजय राऊत यांनाही चांगली सुबुद्धी यावी. पूजा करणे गरजेचे आहे. त्यासाठी 101 ब्राह्मण बोलवून आपण पूजा करू, संजय राऊत ज्या ठिकाणी सांगतील, त्या ठिकाणी पूजा करतो.

लँड जिहाद‎ करणाऱ्याना धडा शिकवा असे आवाहन पडळकर यांनी केले. जिल्हाधिकारी,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎आयुक्त, सीईओ यांनी तत्काळ आपापल्या‎ परिसरातील अतिक्रमण उद्ध्वस्त करावे, अशी मागणी केली.

लव्ह‎ जिहाद बंद करण्यासाठी आई-वडिलांनी ‎वेळीच लक्ष दिले पाहिजे, मुलींना, महिलांना ‎ब्लॅकमेलिंग करून फसवले जाते.‎ पाकिस्तान जिंकल्यावर फटाके‎ फोडणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई वेळीच ‎करावी. धर्मांतरासाठी प्रयत्न करणाऱ्यांना ‎ठोकून काढा. धर्मांतर विरोधी कायदा वेळीच‎ झाला पाहिजे. वाकड्या नरजेने पहाणाऱ्यांचा ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎वेळीच बंदोबस्त करावा, असे आवाहन पडळकर यांनी केले.

It is unfortunate that a son like Uddhav Thackeray should be born to Balasaheb Thackeray, says Gopichand Padalkar

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023