विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा समितीने हैदराबाद गॅझेटिअर मान्य असल्याचे सांगितल्याने गावातील, नात्यातील, कुळातील लोकांना चौकशी करुन कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. उपसमितीने मनोज जरांगे यांच्यासमोर मान्य केलं. Maratha reservation
सातारा गॅझेटच्या (मागणीवर जलदगतीने निर्णय घेणार असल्याचंही उपसमितीने मान्य केलं. मराठा आणि कुणबी एकच असल्याची मागणी जरांगे यांनी केली होती. त्यावर ही प्रक्रिया किचकट आहे, त्यासाठी एक-दोन महिन्यांचा वेळ द्यावा अशी मागणी उपसमितीने केली आहे.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पाच मागण्या केल्या होत्या. त्यावर मराठा उपसमितीकडून आठ प्रस्ताव जरांगे यांना देण्यात आले. हैदराबादच्या गॅझेटची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच उपसमितीने मसुद्यात ज्या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत त्यावर तातडीने जीआर काढण्यात येणार असल्याचा शब्द उपसमितीने दिला आहे.
उपसमितीने मागण्या मान्य केल्यानंतर त्याचा तातडीने जीआर काढावा, जीआर काढल्यानंतर एका तासात मुंबई रिकामी करतो असं मनोज जरांगे म्हणाले. मराठ्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलकांनी एकच जल्लोष केला.
हैदराबाद गॅझेटची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी अशी मनोज जरांगे यांची मागणी होती. त्याला शासनाने मान्यता दिली आहे. गावातील, कुळातील नात्यातील व्यक्तींना चौकशी करुन कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात येईल. सातारा गॅझेटवर अभ्यास करून त्याला जलद मान्यता देण्यात येईल. त्यामध्ये काही त्रुटी आहेत, एका महिन्यात त्याला मान्यता देण्यात येणार आहे. मराठा आदोलकांवरील या आधीचे गुन्हे सप्टेंबर अखेर मागे घेण्यात येणार.शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देणारआहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये बलिदान दिलेल्या वारसांसाठी 15 कोटींची मदत देणार. आठवड्याभरात त्यांच्या खात्यात मदत जमा होईल.
It will be easier to get a Kunbi certificate : Maratha reservation
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांनी आम्हाला ज्ञान शिकवू नये, राधाकृष्ण विखे पाटील यांचा टोला
- शरद पवार भेटीला पोचणार म्हटल्याबरोबर मनोज जरांगे ताठ; उर्मट भाषेत फडणवीसांच्या पाठोपाठ राज ठाकरेंवर निशाणा!!
- मनोज जरांगे प्रमाणिक, पण त्याचा वापर, रोहित पवारांकडून रसद, नितेश राणे यांचा आरोप
- स्वतःचं पोरगं निवडणुकीत पाडलं, कधीपर्यंत भाजपची री ओढणार? मनाेज जरांगे यांचा राज ठाकरेंना सवाल