विशेष प्रतिनिधी
अकोला : Sanjay Shirsat वसतिगृहासाठी 5, 10, 15 कोटींचा निधी मागा. नाही दिला तर नाव सांगणार नाही. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?, असे वादग्रस्त विधान सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.Sanjay Shirsat
अकोला शहरातील निमवाडी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या नूतन वास्तूचे लोकार्पण सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झाले. यावेळी भाषणादरम्यान त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेनेचे मंत्री-आमदार आणि वादग्रस्त वक्तव्य हे समीकरण झाले आहे. शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांनी समज दिल्यानंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सुनावल्यानंतर वादग्रस्त मंत्र्यांची विधाने सुरूच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना खडेबोल सुनावून यापुढे असले काही सहन केले जाणार नाही, अशी तंबीदेखील नुकतीच मंत्रिमंडळ बैठकीत दिली होती.Sanjay Shirsat
या आधी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली होती, गृृह राज्यमंत्री योगेश कदम सावली बारमुळे वादग्रस्त झाले आहेत, तर संजय शिरसाट यांच्या बेडरुममधील कथित पैशांची बॅग आणि विट्स हॉटेल प्रकरण यामुळे सरकारला प्रचंड मानहानी सहन करावी लागली होती. शिवाय त्यांचे नेते एकनाथ शिंदेही टीकेचे धनी बनले होते. त्यांना एकनाथ शिंदेंनी समज दिल्यानंतर शिरसाट यांनी पुन्हा नवे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
It’s the government’s money, what’s going on with my father? Minister Sanjay Shirsat’s controversial statement again
महत्वाच्या बातम्या
- Sadhvi Pragya Singh : भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देवच करेल शिक्षा, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा संताप
- एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना न्यायालयान कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा
- बांग्लादेशीयांची बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी टास्कफोर्स, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
- Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांच्या तमाशा शब्दावर मुख्यमंत्र्यांचा जाेरदार हल्लाबाेल, हा तर भारतीय सैन्याचा अपमान