विशेष प्रतिनिधी
मुंबई : Dadar Kabutarkhana दादर येथील कबूतरखाना (Dadar Kabutarkhana) पुन्हा सुरू करण्यासाठी जैन मुनी निलेशचंद्र यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून आझाद मैदानात उपोषण आंदोलन केले जाणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने दादर येथील कबूतरखाना (Dadar Kabutarkhana) बंद करण्यात आला. तेव्हापासून जैन धर्मिय नागरिक आणि जैन मुनी कबुतरखाना सुरु करण्यासाठी विविध आंदोलने करत आहेत. मुंबई महानगरपालिकेकडून चार ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्यासाठी तात्पूरती सोय करण्यात आली आहे. मात्र दादार येथील कबुतरखाना पुन्हा सुरु करण्यात यावा यासाठी जैन मुनींकडून उपोषण सुरू केले जाणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांमुळे होणाऱ्या आजारांचा मुद्दा लक्षात घेऊन मुंबईतील कबुतरखाने (Dadar Kabutarkhana) बंद करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात जैन धर्मगुरू आणि समुदायातील नागरिकांमध्ये नाराजी आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने दादर कबुतरखाना बंद केला. त्यानंतर जैन समुदायाने याला आक्रमक विरोध करत ताडपत्री टाकून बंद केलेला कबुतरखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. या आंदोलनाच्या विरोधात मराठी एकीकरण समितीने देखील आंदोलन केले होते.
http://youtube.com/post/UgkxV9SZ0HDA-LvvhQxLtlHVl7BlQLBnIHfu?si=LWLhL4D9v5CXN3QZ
मुंबई महानगर पालिकेकडून कबुतरांना दाणे टाकण्यासाठी तात्पूरत्या चार जागांची सोय करण्यात आली आहे. वरळी येथील जलाशय परिसर, अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला बॅकरोड जवळचा खारफुटी परिसर, जुना ऐरोली-मुलुंड जकात नाका आणि बोरिवली पश्चिम येथील गोराई मैदान यांचा समावेश आहे. या चार जागांवर सकाळी 7 ते 9 या वेळेत पक्षांना दाणे टाकण्याची तात्पुरती परवानी महानगरपालिकेने दिली आहे. मात्र अंधेरी, मुलुंड, बोरिवली भागातील स्थानिकांनी विरोध केला आहे. पालिकेने आपला निर्णय त्वरीत मागे घ्यावा, अशी मागणी होत आहे.
मराठी एकीकरण समितीने महानगरपालिकेच्या निर्णयाला कडाडून विरोध केला. भविष्यात या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. नागरिकांनी या निर्णयावर हरकती नोंदवाव्यात अशी मागणी त्यांनी केली. या अवाहनानंतर 9 हजार 779 हरकती पालिकेला प्राप्त झाल्या.
Jain Monks Begin Hunger Strike from Today Demanding Reopening of Dadar Kabutarkhana
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















