विशेष प्रतिनिधी
जालना : जालना शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांना कंत्राटदाराकडून 10 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. बांधकाम विभागातील बिल देण्याच्या बदल्यात कंत्राटदाराकडून दब्बल 10 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले . Jalna Municipal Corporation
जालना महानगरपालिकेचे पहिले आयुक्त म्हणून कारभार पाहात असलेले संतोष खांडेकर हे १० लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले. मनपा आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानी गुरुवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.
या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक माधुरी केदार कांगणे यांनी सांगितले की तक्रारदार बांधकाम कंत्राटदाराकडून केलेल्या कामाचे देयक काढण्यासाठी मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांनी मोठी रक्कम लाच म्हणून मागितली. त्यातील १० लाख रुपयांवर तडजोड झाली. त्या संदर्भातील तक्रार नोंद झाल्यानंतर खांडेकर १० लाख घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लावलेल्या सापळ्यात अडकले.
संतोष खांडेकर हे जालना महापालिकेचे आयुक्त आहेत. याआधी जालना नगर परिषदेत ही त्यांनी मुख्यधिकारी म्हणून काम पाहीले आहे. प्रमोशनवर ते परत जालना महापालिकेत आयुक्त म्हणून आले आहेत. जालना महापालिकेच्या इमारतीचे सध्या काम सुरू आहे. एका ठेकेदाराला देण्यासाठी त्यांनी एक कोटींची लाच मागितल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या लाचेचा पहिला हाफ्ता म्हणून 10 लाख रूपये देण्याचं निश्चित झालं होतं. यानंतर त्यांना पकडण्यात आले आहे.
Jalna Municipal Corporation Commissioner arrested while accepting bribe of Rs 10 lakh from contractor
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा