विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर : माघार घेतली नसती आणि निवडणुका लढविल्या असत्या तर आज चित्र वेगळे झाले असते. आम्ही निवडून आलाे असताे किंवा पडलाे असताे. पण महाराष्ट्रात एक दबदबा तयार झाला असता. राजकीय पक्षांनी दखल घ्यावी लागली असती असे म्हणत मराठा आंदाेलक मनाेज जरांगे यांची चूक झाली असे विनाेद पाटील यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाइ लढणारे विनाेद पाटील म्हणाले, जरांगे पाटील हे माझे भाऊ आहेत. मित्र आहेत. पण त्यांनी निवडणुकीतून माघार घ्यायला नको होती. मात्र त्यावेळीआमची मोठी चूक झाली. आम्ही जर निवडणूक लढवली असती, कमी जास्त मत पडली असती, परंतु त्या -त्या भागामध्ये आमचं एक नेतृत्व तयार झालं असते. राजकीय पक्षांना सुद्धा दखल घ्यावी लागली असती.
माझी भावना एकच आहे, मी न्यायालयाची लढाई लढतो आहे. मुंबई हायकोर्टात आम्ही जिंकलो परंतु सुप्रीम कोर्टात हरलो. मनोज जरांगे पाटील सुद्धा रस्त्यावरची लढाई लढत आहेत. त्यामुळे आमच्या दोघांचा उद्दिष्ट एकच आहे. की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. रस्त्यावरची लढाई सुद्धा महत्त्वाची आहे आणि न्यायालयीन लढाई सुद्धा महत्त्वाची आहे. समितीला मुदतवाढ देण्याची पद्धत आहे. ते जितक्या वेळेस मागतील तितक्या वेळेस द्यावी लागेल, असेही विनोद पाटील म्हणाले.
आझाद मैदानावरील आंदोलनासाठी फक्त एक दिवसांची परवानगी दिली आहे. त्यावर देखील विनोद पाटील म्हणाले, काेणतेही आंदोलन असेल तर पोलीस प्रशासन, किंवा कोणतंही प्रशासन त्यांच्या सोयीप्रमाणे अटी घालत असतात. न्यायालयाचा निर्देश आहे, त्यामध्ये अटी घातल्या आहेत, हा त्यांचा अधिकार आहे. परंतु प्रश्न हा आहे की, आंदोलन एक दिवस असेल, एक महिना असेल हा संपूर्ण कायद्याचा विषय आहे. यामध्ये राज्य सरकार काय भूमिका घेईल? हे त्यांच्याकडूनच स्पष्ट झाल्यावर कळेल.
Jarange Patil made a big mistake during the election, claims Maratha leader Vinod Patil
महत्वाच्या बातम्या
- किती माजलाय तो जरांग्या, भाषा मग्रुरीची : गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबाेल
- मंत्र्याला काढण्याची घटनेतच तरतूद तर घटना दुरुस्ती कशासाठी, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
- न्यायदेवता अन्याय करणार नाही, मुंबईत जाणारच : मनाेज जरांगेंचा निर्धार
- एकेरी भाषा, आयाबहिणींवर अपशब्द खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनाेज जरांगेंना इशारा