विशेष प्रतिनिधी
सातारा : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या बदनामी आणि खंडणी प्रकरणात चौकशीचा एक भाग म्हणून माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्या निवासस्थानी पोलिस दाखल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी वडूज पोलिसांनी रामराजे यांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे समन्स बजावले होते.
जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले होते. या महिलेची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. याच महिलेसोबत रामराजे यांचे मोबाईल वरचे संभाषण देखील काही दिवसांपूर्वी उघड झाले होते. त्यानंतर संबंधित महिलेला एक कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना सातारा पोलिसांनी अटक केली होती. जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी प्रकरणात याआधी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर आता माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची देखील चौकशी सुरू आहे. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 11 जणांना समन्स बजावले आहे.
मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी आणि खंडणी प्रकरणाच्या चौकशीदरम्यान सातारा जिल्ह्यातील वडूज पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना समन्स बजावले होते. त्यांच्यासह आणखी 11 जणांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून, रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर कोणतेही ठोस आरोप सिद्ध झालेले नाहीत. पोलिसांनी चौकशीसाठी त्यांना समन्स बजावले असून, पुढील तपासासाठी त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने विनयभंग आणि अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात महिलेने गोरे यांच्याकडून 3 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे समोर आले होते. महिला आणि तिच्या दोन सहकाऱ्यांना 21 मार्च 2025 रोजी 1 कोटी रुपये स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात वरिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस नेते रामराजे नाईक निंबाळकर आणि इतर 11 जणांना सातारा पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. जयकुमार गोरे यांनी या आरोपांना खोटे ठरवत, विरोधकांवर राजकीय हेतूने बदनामी करण्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, अधिकृत निष्कर्षाची प्रतीक्षा आहे.
Jayakumar Gore defamation and extortion case, police enter Ramraje Naik Nimbalkar residence
महत्वाच्या बातम्या
- Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!
- Air India : एअर इंडियाने जारी केली अॅडव्हाझरी; जम्मू, लेह, जोधपूरसह सीमावर्ती भागात उड्डाणे रद्द
- Pakistans : पाकिस्तानचा कबूलनामा : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत ११ सैनिक ठार, ७८ जखमी
- Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?