विशेष प्रतिनिधी
सांगली : ज्याला गावात मतदान होत नाही, तो हजारोंच्या मताधिक्याने निवडून येतो. जे अचंबित करणारे आहे. माझा प्रॉब्लेम असून मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नसल्याचा पलटवार राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. Jayant Patil
गेल्या काही दिवसांपासून सांगलीत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. हिम्मत असेल तर आमदाराकीचा राजीनामा द्या आणि माझ्याविरुद्ध निवडणूक लढा असं आव्हान गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटील यांना दिलं होतं. जयंत पाटील यांनी पडखळकरांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना जयंत पाटील म्हणाले, ज्याला गावात मतदान होत नाही, तो हजारोंच्या मताधिक्याने निवडून येतो.
जे अचंबित करणारे आहे. हे फक्त मतचोरीमुळेच झाले. माझा प्रॉब्लेम काय आहे, मंगळसूत्र चोरांच्या विरोधात मी लढत नाही? पण मुद्दा काय आहे, वोट चोरी झाली तिथे राजीनामा द्या आणि परत निवडणुका घ्या. आता हे महिनाभर चालेल. समाजामध्ये असेही काही लोक लागतात. जे निंदा करतात.
त्याला उत्तर देताना पडळकर म्हणाले, जयंतराव राजीनामा द्या आणि मैदानात उतरा मी तुमच्याविरोधात निवडणूक लढवतो जयंत पाटलांची मानसिकता मला खचल्यासारखी दिसत आहेत. ते म्हणतात तसे सांगली जिल्हा, वाळवा तालुका कधी झुकत नाही, जे बरोबर आहे. पण जयंत पाटील हा झुकत नाही, थेट पालथाच पडतोय.
Jayant Patil hits back at Gopichand Padalkar: I am not fighting against mangalsutra thieves
महत्वाच्या बातम्या
- किती माजलाय तो जरांग्या, भाषा मग्रुरीची : गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबाेल
- मंत्र्याला काढण्याची घटनेतच तरतूद तर घटना दुरुस्ती कशासाठी, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
- न्यायदेवता अन्याय करणार नाही, मुंबईत जाणारच : मनाेज जरांगेंचा निर्धार
- एकेरी भाषा, आयाबहिणींवर अपशब्द खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनाेज जरांगेंना इशारा